थिएटरमध्ये स्वामी समर्थांचा जयजयकार सुरू असून ‘देऊळ बंद 2’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रभावी प्रतिसाद मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत या चित्रपटाने किती कोटी रुपयांची कमाई केली, ते जाणून घेऊयात.
https://prahaar.in/2026/05/24/rcc-classes-shivraj-motegaonkar-neet-controversy-now-a-flood-of-memes-motegaonkars-water-therapy-is-being-discussed-heavily-on-social-media/
‘देऊळ बंद 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी २.४५ कोटी रुपयांची पेटी जमवली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी २.५५ कोटी रुपयांची कमाई झाली होती. ‘देऊळ बंद 2’च्या वीकेंडच्या कमाईत दुप्पट वाढ झाल्याचं पहायला मिळालं. पहिल्या शानिवारच्या कमाईचा आकडा ४.८५ कोटी रुपयांवर पोहोचला.
https://prahaar.in/2026/05/24/when-will-raja-shivaji-be-released-on-which-ott/
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी याने राघव शास्त्रीची मुख्य भूमिका साकारली होती. आता ‘देऊळ बंद 2’मध्ये प्रवीण तरडे यांची पत्नी स्नेहल तरडे हिने एका शेतकरी महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे. तर अभिनेते मोहन जोशी हे पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत ज्याना प्रेक्षकणी मनभरून पसंत केले आहे.
https://prahaar.in/2026/05/23/will-deul-band-fame-gashmeer-mahajani-soon-appear-before-the-audience-in-a-new-role/
या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे. त्यांच्या वास्तववादी मांडणीमुळे आणि प्रभावी लेखनकौशल्यमुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे ‘देऊळ बंद 2 – आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला आणि संभाव्य ब्लॉकबस्टर चित्रपट ठरणार असल्याची चर्चा चित्रपट वर्तुळात सुरू झाली आहे.