Home ताज्या घडामोडी Rain in Mumbai : मान्सूनपूर्व पावसाच्या शिडकाव्याने मुंबईकर सुखावले

Rain in Mumbai : मान्सूनपूर्व पावसाच्या शिडकाव्याने मुंबईकर सुखावले

0
Rain in Mumbai : मान्सूनपूर्व पावसाच्या शिडकाव्याने मुंबईकर सुखावले

मुंबई : मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी रविवारची सकाळ ही मान्सूनपूर्व पावसाच्या शिडकाव्याने झाली. पावसाच्या हलक्या सरींनी नागरिक सुखावले. उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडा वेळ आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेता आला. वांद्रे, खार रोड, मीरा रोड, भाईंदर, ठाणे, अंबरनाथ, टिटवाळा अशा वेगवेगळ्या भागांमध्ये सकाळी वेगवेगळ्या वेळेत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या.

पावसामुळे थोड्या वेळासाठी पारा घसरला. तापमान उतरले, त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडा वेळ दिलासा मिळाला. पण पाऊस थांबताच पुन्हा पारा चढला आणि उकाड्याचा त्रास वाढला.

https://prahaar.in/2026/05/24/power-cut-between-khadavli-titwala-due-to-morning-rain-central-railway-traffic-was-disrupted-trains-started-after-6-am/

हवामानातल्या बदलामुळे थोडा वेळ दमट वातावरणातून दिलासा मिळाला. आज दिवसभरात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) काही भागांमध्ये आणखी पावसाची शक्यता आहे.