Home ताज्या घडामोडी Marathi Singer Accident : लोकप्रिय गायकांचा अपघात ; एकाला दुखापत तर दोघींवर शस्त्रक्रिया !

Marathi Singer Accident : लोकप्रिय गायकांचा अपघात ; एकाला दुखापत तर दोघींवर शस्त्रक्रिया !

0
Marathi Singer Accident : लोकप्रिय गायकांचा अपघात ; एकाला दुखापत तर दोघींवर शस्त्रक्रिया !
Ganesh Shinde & Sanmita Shinde

प्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाला असून वेळीच गाडीतील एअरबॅग्स उघडल्यानं मोठा अनर्थ टळला. गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली असून गायिका सन्मिता शिंदे आणि प्रतिक्षा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघींवर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून गणेश शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

गणेश शिंदे यांची पोस्ट…

https://prahaar.in/2026/05/24/bollywood-news-this-foreign-actress-has-become-number-1-on-youtube-surpassing-alia-shilpa-madhuri/

‘कानावरून गेलं…“मोगरा फुलला” कार्यक्रम आटपून घरी परतत असताना आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स ओपन झाल्यानं मोठा अनर्थ टळला. मला एअरबॅग्समुळे छातीला दुखापत झाली असली तरी ती ऑपरेशनशिवाय बरी होण्यासारखी आहे. सन्मिता आणि गायिका प्रतिक्षा यांच्या पायाला दुखापत झाली. मित्रपरिवार, ॲम्ब्युलन्स सेवा आणि माऊली हॉस्पिटल तसेच संचेती हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तातडीनं मदत केल्यामुळे सर्व उपचार वेळेत सुरू झाले.’

https://prahaar.in/2026/05/24/tech-layoffs-job-crisis-due-to-the-growing-impact-of-ai-after-meta-linkedin-cisco-also-lays-off-thousands-of-employees/

‘प्रतिक्षाचं ऑपरेशन व्यवस्थित झालं असून सन्मिताचेही ऑपरेशन आता व्यवस्थित होईल. ओटीमध्ये जाताना तिला ज्ञानोबारायांचा फोटो दाखवला मोबाईलमध्ये. म्हटलं तू आता बरी होशील आणि माऊलीसमोर अभंग म्हणशील. इवलेसे रोप लावियेले द्वारी…या संपूर्ण प्रसंगात अनेक प्रश्न मनात येतात, पण शेवटी जाणवतं, अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढे अधिक काळजी घ्यायची आणि बाकी सर्व माउलींच्या चरणी स्वाधीन करायचं.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here