मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेत ४ पोलीस कर्मचारी आणि ६ आंदोलक जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर भाभा रुग्णालय आणि व्ही. एन. देसाई रुग्णालयात उपचार करण्यात आले.
https://prahaar.in/2026/05/21/clashes-during-on-site-operation-in-bandra-area-police-take-strong-action-to-control-the-crowd/
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेकडून वांद्रे टर्मिनसजवळील गरीब नगर, बेहरामपाडा परिसरात रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होती. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवत आंदोलन केले. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर जमावाकडून पोलिसांवर आणि कारवाई पथकावर दगडफेक करण्यात आली.
या दगडफेकीत पोलीस कर्मचारी विपुल विजयकुमार कदम (३९), मनीष भीमराव बच्छाव (४४), जितेंद्र कुमार सतेंदर (४५), नवनाथ अण्णा मुदगुळ (४५), ओंकार दीपक कोळी (३९) आणि चंद्रकांत ढाम्बळे (४५) जखमी झाले. यापैकी जितेंद्र कुमार सतेंदर यांना व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. इतर पोलिसांनी उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला.
https://prahaar.in/2026/05/20/encroachment-removal-campaign-outside-bandra-station-municipal-corporation-takes-action-against-unauthorized-mosque/
या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.