Home ब्रेकिंग न्यूज Modi : पंतप्रधानांना रोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे ‘ॲग्रिकोला पदक’ प्रदान

Modi : पंतप्रधानांना रोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे ‘ॲग्रिकोला पदक’ प्रदान

0
Modi : पंतप्रधानांना रोम येथे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे ‘ॲग्रिकोला पदक’ प्रदान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे (एफएओ) रोम येथील मुख्यालयात २०२६ साठी प्रतिष्ठेच्या ‘ॲग्रिकोला’ पदकाने सन्मानित करण्यात आले. भारतात आणि जागतिक स्तरावर अन्न सुरक्षा, शाश्वत कृषी आणि ग्रामीण विकास, यासारख्या क्षेत्रांमधील त्यांच्या असाधारण नेतृत्वाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.एफएओचे महासंचालक डॉ. क्यू डोंग्यू यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांनी हा सन्मान भारतातील शेतकरी आणि भारतीय कृषी वैज्ञानिक समुदायाला समर्पित केला, जे भारतातील आणि जगभरातील लोकांसाठी अन्न सुरक्षा आणि पोषण सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम घेतात. हा सन्मान म्हणजे मानव कल्याण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकासाप्रति असलेल्या भारताच्या वचनबद्धतेचा गौरव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतातील कृषी जीवनाचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी यावर जोर दिला की, शेती हे धरणीमाता आणि भारतीय जनता यांच्यातील एक पवित्र बंध आहे.

भारताचा वैज्ञानिक आणि नवोन्मेष-आधारित शेतीचा दृष्टीकोन शाश्वत, हवामान-अनुकूल आणि भविष्यासाठी सज्ज परिसंस्थेला चालना देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या प्रयत्नात, ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’, सारख्या पद्धती आणि सूक्ष्म सिंचन आणि अचूक शेतीसाठीचा मिशन-आधारित दृष्टीकोन, भारताच्या कृषी धोरणांना दिशा देत आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, एफएओचा संस्थापक सदस्य म्हणून, जागतिक अन्न सुरक्षा, शाश्वत शेती आणि उपासमार मुक्त जगाला चालना देण्यासाठी या संस्थेबरोबर काम करण्याचा बहुमान भारताला मिळाला. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे करून आरोग्यदायी अन्नाच्या निवडीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताबरोबर काम केल्याबद्दल त्यांनी अन्न आणि कृषी संघटनेचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here