मुंबई : पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ याचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. आज म्हणजेच बुधवार २० मे रोजी बाजार उघडताच मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव निर्माण झाला आणि प्रमुख निर्देशांक घसरणीसह व्यवहार करताना दिसले. सलग दुसऱ्या दिवशी बाजारात घसरण कायम राहिल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Share Market Sensex Today)
https://prahaar.in/2026/05/20/yashwant-cooperative-bank-closed-how-will-account-holders-get-money-know-the-complete-process/
आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २९ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल निशाणावर उघडले. केवळ एका कंपनीचा शेअर वाढीसह हिरव्या निशाणावर दिसला. निफ्टी ५० मधील परिस्थितीही जवळपास अशीच होती. निफ्टीतील ५० पैकी ४९ कंपन्यांचे शेअर्स घसरले, तर फक्त एका शेअरमध्ये वाढ नोंदवली गेली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘टीसीएस’चा शेअर ०.१४ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होता. दुसरीकडे, ‘बीईएल’चा शेअर सर्वाधिक २.०४ टक्क्यांनी घसरला. (Share Market Sensex Today)
https://prahaar.in/2026/05/18/silver-price-will-silver-become-more-expensive-price-hike-likely-after-governments-big-decision/
याशिवाय बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, एचसीएल टेक, इंडिगो, आयटीसी, टायटन, अॅक्सिस बँक, एलअँडटी, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, सन फार्मा आणि भारती एअरटेल यांच्या शेअर्समध्येही घसरण दिसून आली. जागतिक स्तरावरील अनिश्चितता आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे आगामी काही दिवस बाजारात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Share Market Sensex Today)
https://prahaar.in/2026/05/17/cows-milk-is-now-expensive-gokuls-big-decision-new-rates-to-come-into-effect-from-21-may/