IPL 2026 : आयपीएल २०२६ मध्ये काल म्हणजेच मंगळवार, १९ मे रोजी राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियम येथे सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने लखनौवर ७ विकेट्सने विजय मिळवत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या.सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राजस्थानचा कर्णधार रियान परागने त्याच्यावर होत असलेल्या टीकेवर जोरदार प्रतिक्रिया दिली. त्याने थेट समालोचकांनाच सुनावले. त्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.
आयपीएल 2026 या हंगामात रियान पराग अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. काही दिवसांपूर्वी तो व्हेपिंग प्रकरणामुळे वादात अडकला होता. त्या प्रकरणात बीसीसीआय (Board of Control for Cricket in India) कडून त्याच्यावर दंडही ठोठावण्यात आला होता.पत्रकार परिषदेत त्याला विचारण्यात आले की, सतत होणाऱ्या टीकेचा तो कसा सामना करतो? यावर उत्तर देताना रियान परागचा संताप अनावर झालेला दिसला.
https://prahaar.in/2026/05/20/wtc-points-table-bangladesh-beats-pakistan-wtc-table-in-turmoil-india-also-suffers-a-major-setback/
नेमकं काय म्हाणाला रियान?
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना रियान पराग म्हणाला की; “मी काहीही केले तरी लोक बोलणारच, हे मला आता समजले आहे. त्यामुळे लोक काय म्हणतात यावर जास्त विचार न करता मी माझ्या कामावर लक्ष देतो. जे काही बोलले जाते त्याचा माझ्या खेळावर, फॉर्मवर किंवा मानसिकतेवर परिणाम होऊ नये, याकडे मी अधिक लक्ष देतो.”
🔴CONTROVERSIAL STATEMENT BY RIYAN PARAG ON IPL COMMENTARRS🤯
🎙️ – Parag criticized IPL commentators and said cricket discussions should stay limited to the game only, adding that India’s biggest sport deserves more respect.🙄pic.twitter.com/GyGLYx7eEz
— Sam (@cricsam02) May 20, 2026
समालोचकांना थेट संदेश :
पुढे बोलताना परागने समालोचकांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. तो म्हणाला,या वर्षी आयपीएलमध्ये मैदानावर जे घडते त्यापेक्षा बाहेरच्या गोष्टींची जास्त चर्चा होत आहे. संपूर्ण देशाला क्रिकेट खूप आवडतं. आम्ही मैदानात उतरताना प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. तो पुढे म्हणाला,ज्या समालोचकांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचतो, त्यांनी क्रिकेटवर प्रेम करावं आणि क्रिकेटबद्दलच बोलावं. देशासाठी इतका महत्त्वाचा असलेल्या या खेळाचा आदर केला पाहिजे. परागच्या बोलण्यावरुन काही लोक म्हणत आहेत की त्याने समालोचकांना थेट इशारा दिला आहे की, फक्त क्रिकेट बद्दल बोला. या विधानामुळे क्रिकेट वतृळात पुन्हा खळबळ उडाली आहे.