मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. “पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका. राज्यात आणि देशात पुरेसा साठा उपलब्ध आहे. अफवांमुळेच पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण होतो,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?
https://prahaar.in/2026/05/20/shashikant-shinde-there-is-no-more-discussion-on-the-merger-of-ncp/
मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) पुढे म्हणाले, “पुरवठा साखळी ही अनेक वर्षांच्या वापराच्या अंदाजावर आधारित असते. एखाद्या तालुक्यात किंवा पेट्रोल पंपावर दररोज किती इंधनाची गरज असते, यानुसार पुरवठा केला जातो. पण अचानक लोकांनी जास्त प्रमाणात पेट्रोल-डिझेल भरायला सुरुवात केली, तर संपूर्ण साखळीवर ताण येतो.”
https://prahaar.in/2026/05/20/devendra-fadnavis-maharashtra-will-lead-the-country-in-the-field-of-nuclear-energy/
“जागतिक परिस्थिती सध्या तणावपूर्ण असली, तरी भारताने आपली पुरवठा व्यवस्था सक्षम ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये आणि इंधनाचा वापरही जबाबदारीने करावा,” असे आवाहनही त्यांनी (Devendra Fadnavis) केले.
https://prahaar.in/2026/05/20/iran-america-war-economic-blow-to-iran-america-puts-a-noose-on-foreign-exchange-network-sanctions-on-foreign-exchange-company-and-19-ships/
सध्या काही शहरांमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा दिसत असल्या, तरी प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.