Home क्रीडा Sandeep lamichhane : संदीप लामिछानेने केला वनडेत सर्वाधिक वेगाने १५० विकेट्स घेण्याचा विक्रम

Sandeep lamichhane : संदीप लामिछानेने केला वनडेत सर्वाधिक वेगाने १५० विकेट्स घेण्याचा विक्रम

0
Sandeep lamichhane : संदीप लामिछानेने केला वनडेत सर्वाधिक वेगाने १५० विकेट्स घेण्याचा विक्रम

त्रिभुवन : नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड या वन डे मध्ये नव्या विक्रमाची नोंद झाली. नेपाळच्या संदीप लामिछानेने या मॅच दरम्यान वनडेत सर्वाधिक वेगाने १५० विकेट्स घेण्याचा विक्रम केला. वन डे क्रिकेटमध्ये ही कामगिरी करत त्याने अनेक दिग्गजांना मागे टाकले. संदीपने हा पराक्रम फक्त ७३ मॅचमध्ये केला. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावावर होता. त्याने २०१९ मध्ये ७७ व्या मॅचमध्ये या विक्रमाला गवसणी घातली होती. याआधी पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकने ७८ मॅचमध्ये हा विक्रम केला होता. भारताच्या मोहम्मद शमीने ८० मॅचमध्ये १५० विकेट्स घेतल्या होत्या.

आधीच १०० विकेट्सचा विक्रम

लामिछानेच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम आहे. त्याने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगाने १०० विकेट्स घेण्याचाही विक्रम केला आहे. हा विक्रम त्याने फक्त ४२ मॅचमध्ये केला आहे.

सर्वात जलद १५० वनडे विकेट्स (मॅचनुसार)

७३ मॅच – संदीप लामिछाने (नेपाळ)

७७ मॅच – मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)

७८ मॅच – सकलेन मुश्ताक (पाकिस्तान)

८० मॅच – राशिद खान (अफगाणिस्तान)

८० मॅच – मोहम्मद शमी (भारत)

https://prahaar.in/2026/05/19/lsg-vs-rr-rajasthan-vs-lucknow-in-apl-today-the-decisive-match-the-result-will-affect-punjab/

नेपाळचा स्कॉटलंडवर विजय

नेपाळच्या त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात नेपाळ विरुद्ध स्कॉटलंड अशी वन डे मॅच झाली. यात स्कॉटलंडच्या मायकल इंग्लिशने ५१ धावांची खेळी केली. नेपाळकडून ललित राजवंशीने शानदार गोलंदाजी करत ८ षटकांत ३२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. यानंतर नेपाळने ३८.१ षटकांत ४ विकेट्स गमावत लक्ष्य गाठले आणि शानदार विजय मिळवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here