Home ब्रेकिंग न्यूज Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन

Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन

0
Tushar Gaikwad : खासदार वर्षा गायकवाड यांचे बंधू तुषार गायकवाड यांचे निधन
Tushar Gaikwad

मुंबई : उत्तर-मध्य मुंबईच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे धाकटे बंधू तुषार एकनाथ गायकवाड (Tushar Gaikwad) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सायंकाळी टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

https://prahaar.in/2026/05/19/prashant-kishor-is-the-new-political-advisor-of-ncp/

तुषार गायकवाड (Tushar Gaikwad) हे मुंबई काँग्रेसमध्ये सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळत होते. पडद्यामागे राहून पक्ष संघटना मजबूत करणे, कार्यकर्त्यांचे जाळे विणणे आणि मुंबईतील काँग्रेसच्या विविध आंदोलनांमध्ये ते नेहमी सक्रिय असायचे. त्यांचे वडील आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष दिवंगत एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण-मध्य मुंबईतून संसदेत आणि राज्य मंत्रिमंडळात दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. २०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकनाथ गायकवाड यांचे निधन झाले होते. पितृछत्राच्या विरहानंतर अवघ्या पाच वर्षांतच धाकट्या भावाचेही छत्र हरपल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

https://prahaar.in/2026/05/19/three-killed-in-shooting-at-islamic-center-in-us/

तुषार गायकवाड (Tushar Gaikwad) यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वपक्षीय नेत्यांनी गायकवाड कुटुंबाचे सांत्वन करत शोक व्यक्त केला आहे. तुषार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन मंगळवारी दुपारी १ ते २ या वेळेत विक्रोळी येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, दुपारी २ ते ४ या वेळेत विक्रोळी कोर्टाजवळील, कन्नमवार नगर येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन’ येथे सर्वसामान्य नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाईल. सायंकाळी टागोर नगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here