देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाने (NEET Paper Leak Case) आता आणखी गंभीर वळण घेतल्याची चर्चा रंगू लागली आहे. लातूरमधील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्रा. मोटेगावकर यांच्याभोवती संशयाचे सावट अधिक गडद होत असल्याचे बोलले जात आहे. त्यांना चौकशीसाठी पुण्यातील सीबीआय कार्यालयात नेण्यात आल्याच्या चर्चेमुळे लातूरसह संपूर्ण राज्यातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
https://prahaar.in/2026/05/18/ipl-2026-dc-vs-rr-delhi-beat-rajasthan-by-5-wickets-in-a-thrilling-match/
या प्राथमिक तपासानंतर सीबीआयने प्रा. मोटेगावकर यांना अधिकृत नोटीस बजावत पुढील चौकशीसाठी सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतर विविध माध्यमांमध्ये वेगवेगळे दावे समोर येऊ लागले. काही वृत्तांमध्ये त्यांना क्लीनचिट मिळाल्याचा दावा करण्यात आला, तर काही ठिकाणी तपास अधिक तीव्र झाल्याचे सांगण्यात आले. (NEET Paper Leak Case)
सर्वात मोठी खळबळ तेव्हा उडाली जेव्हा चौकशी संपल्यानंतर प्रा. मोटेगावकर यांना पुण्यातील सीबीआय कार्यालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली. अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी या चर्चेमुळे लातूरमध्ये प्रचंड उत्सुकता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जण या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (NEET Paper Leak Case)
https://prahaar.in/2026/05/18/america-air-show-two-fighter-jets-collide-during-air-show-in-america-all-our-pilots-safe-event-cancelled/
नीट पेपरफुटी प्रकरण सुरुवातीपासूनच देशभर चर्चेत राहिले आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप झाल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलन करत निषेध नोंदवला होता. त्यानंतर तपास विविध यंत्रणांकडून सुरू झाला आणि अखेर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. (NEET Paper Leak Case)
तपासादरम्यान अनेक राज्यांमध्ये धाडी टाकण्यात आल्या. एजंट, मध्यस्थ, कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्थांशी संबंधित अनेकांची चौकशी करण्यात आली. या साखळीत लातूरचे नाव पुढे आल्यानंतर ‘लातूर पॅटर्न’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिक्षण व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. (NEET Paper Leak Case)
दरम्यान, सीबीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर विविध दावे आणि चर्चांना अधिक उधाण आले आहे. काहींनी तर या प्रकरणात आणखी मोठ्या नावांचा समावेश असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. (NEET Paper Leak Case)
https://prahaar.in/2026/05/18/raja-shivaji-breaks-record-strong-earnings-on-day-17-now-look-at-sairats-record/
सध्या लातूरमध्ये वातावरण चांगलेच तापले असून शैक्षणिक संस्थांमध्ये या प्रकरणाचीच चर्चा सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून “जर शिक्षण क्षेत्रातील मोठी नावेच संशयाच्या भोवऱ्यात अडकत असतील, तर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. (NEET Paper Leak Case)
https://prahaar.in/2026/05/18/firing-near-rss-headquarters-at-midnight-terror-by-6-criminals-on-3-bikes/
आता सर्वांचे लक्ष पुण्यातील सीबीआय कार्यालयाकडे लागले आहे. प्रा. मोटेगावकर यांच्या चौकशीमधून आणखी कोणती नावे समोर येणार आणि नीट पेपरफुटी प्रकरणात पुढचा मोठा खुलासा काय होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (NEET Paper Leak Case)