Home ब्रेकिंग न्यूज Zeeshan Siddique : सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे झिशान सिद्दीकींची आमदारकी अडचणीत ?

Zeeshan Siddique : सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे झिशान सिद्दीकींची आमदारकी अडचणीत ?

0
Zeeshan Siddique : सुनेत्रा पवारांच्या पत्रामुळे झिशान सिद्दीकींची आमदारकी अडचणीत ?

मुंबई : झिशान सिद्दीकी यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेवर आमदारकीची शपथ घेतली. झिशान यांना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म देण्यात आला होता. या फॉर्मवर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची सही आहे. पण सुनेत्रा पवारांनी पाठवलेल्या पत्रामुळे तटकरेंच्या पदाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच तटकरेंच्या सहीने झिशान यांना दिलेले पत्र वैध धरायचे की नाही, असाही पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/05/17/parth-pawar-meets-chief-minister-fadnavis-developments-in-ncp-accelerate/

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी २९ एप्रिल २०२६ रोजी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. या पत्रावरून राजकीय वाद सुरू असतानाच एक नवा राजकीय पेच पण समोर आला आहे.

सुनेत्रा पवार यांनी २९ एप्रिल रोजी पाठवलेल्या पत्रात राष्ट्रवादीच्या नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची मुख्य पदे गायब असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख ‘राज्यसभेचे पक्षनेते’ आणि सुनील तटकरे यांचा उल्लेख ‘लोकसभेचे पक्षनेते’ असा करण्यात आला होता. परंतु, त्यांच्या नावांसमोर ‘राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष’ आणि ‘महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष’ या त्यांच्या मूळ संघटनात्मक पदांचा उल्लेख नव्हता. यामुळेच तटकरेंच्या सहीने झिशान यांना दिलेले पत्र वैध धरायचे की नाही, असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/05/16/patel-and-tatkare-retain-their-posts-ncp-to-soon-send-a-new-letter-to-the-election-commission/

दरम्यान पक्षातील अंतर्गत बदलांबाबत सुरू असलेल्या मोठ्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे त्यांच्या अनुक्रमे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदांवर पूर्ण अधिकारांसह कायम आहेत, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी स्पष्ट केले की, केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात या दोन्ही नेत्यांच्या मुख्य पदांचा उल्लेख नव्हता, ती केवळ एक कारकुनी चूक होती. या संदर्भात निवडणूक आयोगाला लवकरच एक नवीन पत्र पाठवून पटेल आणि तटकरे यांच्यासह पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांची स्पष्ट माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले. पण अद्याप हे पत्र गेलेले नाही. त्यामुळे झिशान सिद्दीकींच्या आमदारकीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here