Home महाराष्ट्र कोकण Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

0
Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार
Nagpur-Madgaon Express

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोकण रेल्वेमार्गे प्रवास करणाऱ्या आणि विदर्भाला जोडणाऱ्या प्रवाशांसाठी नागपूर-मडगाव दरम्यान धावणारी विशेष रेल्वे आता कायमस्वरूपी नियमित करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून ही रेल्वे नियमित सेवेत दाखल झाली आहे.

कोकणवासीयांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी मानली जात आहे. आतापर्यंत विशेष गाडी म्हणून चालवली जाणारी नागपूर-मडगाव-नागपूर रेल्वे आता ‘नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस’ म्हणून ओळखली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी सोय होणार असून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासही मदत होणार आहे.

https://prahaar.in/2026/05/16/mumbai-hyderabad-bullet-train-project/

नागपूरहून ही गाडी १६ मे २०२६ पासून नियमितपणे धावण्यास सुरुवात झाली आहे. ही एक्स्प्रेस दर बुधवारी आणि शनिवारी दुपारी ३:०५ वाजता नागपूर जंक्शनवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

तसेच मडगावहून ही गाडी १७ मे २०२६ पासून नियमित सेवेत दाखल होणार असून दर गुरुवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता मडगाव स्थानकावरून सुटेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री ९:२५ वाजता ही गाडी नागपूर जंक्शनला पोहोचणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामध्ये वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड आणि करमाळी या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे विदर्भ आणि कोकण यांच्यातील प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here