मुंबई : असे म्हटले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते आणि जिथे स्वच्छता असते तिथे आरोग्य निरोगी राहते. याच दृष्टिकोनातून मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहावं. मुंबई स्वच्छ आणि सुंदर दिसावी तसेच कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या विविध पायाभूत सेवा सुविधा यांची यांना साजेशी स्वच्छ आणि सुंदर मुंबईचे चित्र निर्माण व्हावे यासाठी महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आश्विनी भिडे यांनी महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे आपलं लक्ष केंद्रित करू या विभागामार्फत अधिकाधिक चांगल्या प्रकारे स्वच्छता राबवून घेणं आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे याला प्राधान्य दिलेले आहेत. यासाठीच स्वच्छतेची काम ही सकाळीच हाती घेतली जात असल्याने सकाळी उठून संबंधित अधिकाऱ्यांनाही सोबत घेत स्वच्छतेच्या कामाचा आढावा घेण्यावर आयुक्तांनी भर दिला आहे.
https://prahaar.in/2026/05/13/bmc-news-ashwini-bhide/
मुंबई महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी एस विभागातील विक्रोळी (पूर्व) स्थित कन्नमवार नगर स्वच्छता कामगारांच्या चौकीस बुधवारी सकाळी अचानक भेट देऊन पाहणी केली. चौकीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी संवाद साधला.
मुंबईतील रस्ते आणि त्याभोवतीचा परिसर, चौक स्वच्छतेकडे व्यापक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे. कचरा साचणाऱ्या ठिकाणाचे समूळ उच्चाटन करावे. त्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले. उपलब्ध असलेली आधुनिक यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळाचा योग्य वापर करा, अशा सूचनाही भिडे यांनी दिल्या. आयुक्तांच्या या अचानक भेटीमुळे कर्मचाऱ्यांना आयुक्तांची संवाद साधल्याने एक प्रकारे त्यांच्यामध्ये समाधानाचं वातावरण झाले.आणि आपण करत असलेल्या कामाची दखल खुद्द आयुक्त घेतात याचचाही एक प्रकारे आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र आयुक्तांच्या या अचानक भेटीमुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये एक आदरयुक्त भीती निर्माण झाली असून आता कामांमध्ये कोणतीही हयगय किंवा दुर्लक्ष करून चालणार नाही, तर काळजीपूर्वक काम केले पाहिजे याची पक्की खूणगाठ अधिकारी आणि कामगार यांनी मनाशी पक्की बांधल्याचे दिसून येत आहे.
Dear all
A very good decesion.Respect working class Safai kamgar by giving them some appreciation Say Rs per shift of 1,2,3