Home ताज्या घडामोडी ‘Raja Shivaji’ Movie Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ने बॉक्स ऑफिस गाजवलं; चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड!

‘Raja Shivaji’ Movie Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ने बॉक्स ऑफिस गाजवलं; चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड!

0
‘Raja Shivaji’ Movie Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ने बॉक्स ऑफिस गाजवलं; चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तुफान घोडदौड!
Raja Shivaji Box Office Collection 12th Day

मुंबई : १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख याचा ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची भव्य मांडणी, अजय-अतुल यांचं दणदणीत संगीत आणि चित्रपटातील प्रभावी संवाद यामुळे प्रेक्षकांकडून सिनेमाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात रितेश देशमुख यांनी दिग्दर्शनासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘राजा शिवाजी’ने केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरातही मोठी कमाई करत आतापर्यंत ₹८१ ते ₹८६ कोटींहून अधिक गल्ला जमवला असून, त्याने सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

https://prahaar.in/2026/05/13/the-fan-directly-reached-the-stage-sonu-nigam-handled-the-situation-with-patience/

१२ व्या दिवशी ‘राजा शिवाजी’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवरील पकड कायम ठेवली आहे. दुसऱ्या सोमवारच्या दिवशी चित्रपटाने तब्बल २.४० कोटी रुपयांची कमाई केली. त्यानंतर मंगळवारीही चित्रपटाच्या कमाईत वाढ होत २.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात आला. त्यामुळे १२ दिवसांतील चित्रपटाची एकूण कमाई आता ७३.१५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता आगामी वीकेंडमध्येही कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

https://prahaar.in/2026/05/12/youtuber-swanandi-sardesai-is-married/

‘राजा शिवाजी’ बजेट

मीडिया रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट जवळपास ७५ ते १०० कोटी रुपयांच्या मोठ्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. ऐतिहासिक भव्यता, युद्धदृश्यं, सेट्स आणि व्हिज्युअल्स यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. चित्रपट आता आपलं बजेट वसूल करण्याच्या अगदी जवळ पोहोचला असून, येत्या काही दिवसांत तो हा टप्पा सहज पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला असला तरी मराठी आवृत्तीला प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

‘राजा शिवाजी’ची दमदार स्टारकास्ट

‘राजा शिवाजी’मध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार झळकले आहेत. रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून, जिनिलिया देशमुख यांनी सईबाईंची भूमिका निभावली आहे. अभिनेता संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी शहाजी भोसले अर्थात संभाजी राजे यांच्या भूमिकेत अभिषेक बच्चन झळकले आहेत. याशिवाय चित्रपटातील सलमान खानचा cameo सुद्धा प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरत आहे. सलमान खानने जीवा महाला यांची भूमिका साकारली असून, त्याच्या एन्ट्रीला थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here