Home क्राईम Young woman commits suicide : मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; मृत्यूनंतर बापानं वाजवल्या टाळ्या

Young woman commits suicide : मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; मृत्यूनंतर बापानं वाजवल्या टाळ्या

0
Young woman commits suicide : मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; मृत्यूनंतर बापानं वाजवल्या टाळ्या
Girl Sucide

मुंबई : नवी मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेणाऱ्या २४ वर्षीय स्वप्नाली घेवारी हिने वडिलांकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी तिने वडिलांना व्हिडीओ कॉल केला होता. ती वरळी येथे दोन मैत्रिणींसोबत राहत होती. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे घरात सतत वाद होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी वडील सुनील घेवारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी पत्नीच्या माहेरी जाऊन टाळ्या वाजवत धमकी दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

https://prahaar.in/2026/05/12/maharashtra-assemblys-monsoon-session/

पुण्यातील खडकी पिंपळगाव येथील रहिवासी असलेली स्वप्नाली गेल्या चार महिन्यांपासून वरळीच्या महालक्ष्मी सोसायटीमध्ये दोन मैत्रिणींसोबत भाड्याने राहत होती. ती नवी मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत होती. स्वप्नालीचे वडील सुनील घेवारी हे शेतकरी असून त्यांना दारूचे व्यसन होते. त्यामुळे घरात वारंवार वाद आणि भांडणं होत असल्याचं समोर आलं आहे.

घरातील सततच्या त्रासाला कंटाळून २६ एप्रिल रोजी स्वप्नालीची आई स्वाती या वरळी येथे मुलीकडे राहण्यासाठी आल्या होत्या. मात्र, दोन दिवसांनी त्या त्यांच्या बहिणीकडे गेल्या. दरम्यान, १ मे रोजी सुनील घेवारी यांनी स्वप्नालीला वारंवार फोन करून तिच्या आईबाबत विचारणा करण्यास सुरुवात केली. वडिलांकडून सतत होत असलेल्या त्रासाबाबत स्वप्नालीने आईला फोन करून सांगितले होते. त्यावेळी आईने तिला काही काळासाठी मोबाईल बंद ठेवण्याचा सल्ला दिला होता.

https://prahaar.in/2026/05/12/congress-state-general-secretary-abhay-chhajed-car-accident-in-pune-admitted-to-puna-hospital/

रात्री ८ वाजण्याच्या सुमारास स्वप्नालीने आईला पुन्हा फोन केला. “माझी परीक्षा असल्यामुळे मला आता फोन करू नका,” असं तिने सांगितलं. तसेच, वडिलांशी फोनवर मोठं भांडण झाल्याचंही तिने आईला सांगितलं होतं. त्यानंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास स्वप्नालीने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती स्वाती यांना त्यांचे भाऊ सुबोध चिखले यांनी दिली.

या घटनेनंतर स्वप्नालीच्या वडिलांनी पत्नीच्या माहेरी धाव घेतली. तिथे जाऊन स्वप्नालीने व्हिडीओ कॉल करून आत्महत्या केल्याचे सांगत त्यांनी टाळ्या वाजवल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकंच नाही, तर “आता स्वप्नालीप्रमाणे तिच्या आईचाही काटा काढणार,” अशी धमकी दिल्याचंही नातेवाईकांनी सांगितलं. ही माहिती समोर आल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here