तामिळनाडू : साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan) हिच्या राजकारणातील एन्ट्रीच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय थलपती (Vijay Thalapathy) यांनी तिरुचिरापल्ली पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर या जागेसाठी त्रिशा कृष्णनच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. विजय यांनी विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवला होता. त्यापैकी एक जागा रिक्त झाल्याने आता त्या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे.
https://prahaar.in/2026/05/12/raja-shivaji-movie-box-office-collection/
राजकीय वर्तुळात त्रिशा कृष्णन टीव्हीके (TVK) पक्षाकडून निवडणूक लढवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विजय आणि त्रिशा यांच्या चाहत्यांकडूनही तिने राजकारणात यावे, अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून विजय आणि त्रिशा यांच्या अफेअरच्या चर्चांनीही चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे या चर्चांना आणखी रंग चढला आहे.
https://prahaar.in/2026/05/11/from-raja-ravi-varma-van-gogh-to-venus-de-milo-iconic-art-references-that-dominated-the-met-gala-2026-carpet/