Home क्रीडा Tim David : टीम डेव्हिडवर बीसीसीआयची कठोर करवाई, हंगामातून बॅन होण्याची शक्यता !

Tim David : टीम डेव्हिडवर बीसीसीआयची कठोर करवाई, हंगामातून बॅन होण्याची शक्यता !

0
Tim David : टीम डेव्हिडवर बीसीसीआयची कठोर करवाई, हंगामातून बॅन होण्याची शक्यता !

BCCI ACTION : आयपीएल २०२६ मध्ये १० मे रोजी आरसीबी आणि मुंबईचा सामना झाला. या सामन्यात आरसीबीने अखेरच्या षटकात मुंबईचा २ विकेट्सने पराभव केला. पण आरसीबीचा स्फोटक फलंदाज टीम डेव्हिडवर बीसीसीआयने आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मोठी करवाई केली आहे. सामन्यादरम्यान मुंबईच्या खेळाडूंना अश्लील हातवारे केल्याप्रकरणी त्याच्यावर बीसीसीआयने मॅच फी च्या ३० टक्के दंडासह दोन डिमेरिट पॉइंट्सची कारवाई केली आहे.

 

नेमकं प्रकरण काय ?

आरसीबी आणि मुंबईमध्ये १० मे रोजी सामना संपल्यानंतर ही घटना घडली. सामना जिंकल्यानंतर टीम डेव्हिडने डगआउटमधून मिडल फिंगर दाखवली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यानंतर आयपीएल प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत शिस्तभंगाची कारवाई केली आहे. या हंगामातील टीम डेव्हिडची हा दुसरी चूक आहे. यापूर्वी वानखेडेवर मुंबई विरुद्ध सामन्यात त्याने पंचांच्या सूचनांचे पालन न केल्याने त्याच्यावर एक डिमेरीट आणि ३० टक्के मॅच फी एवढा दंड आकारण्यात आला होता.

https://prahaar.in/2026/05/12/srh-vs-gt-a-thrilling-match-will-be-played-between-hyderabad-and-gujarat-for-the-top-spot-the-result-will-affect-rcb/

बॅन होण्याची शक्यता

या आयपीएलमध्ये टीम डेव्हिडच्या नावावर आता तीन डिमेरिट पॉइंट्स जमा झाले आहेत. नियमांनुसार बीसीसीआयने आयपीएल २०२५ पासून खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी डिमेरिट पॉइंटसचे नियम कडक केले आहेत. हे डिमेरिट प़ॉइंट्स ३६ महिन्यांपर्यंत राहतात. चार डिमेरिट पॉइंट्स झाल्यावर खेळाडूवर सामन्याची बंदी लावण्यात येते, तर त्यापेक्षा अधिक डिमेरिट पॉइंटस झाल्यास खेळाडूच्या निलंबनाचा कालावधीही वाढू शकतो. त्यामुळे पुढील दोन हंगामांतही टीम डेव्हिडकडून आणखी चूक झाल्यास त्याला मोठी शिक्षा होऊ शकते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here