Home क्रीडा Rahul Dravid : टी-२० मध्ये फलंदाजी खूप पुढे; गोलंदाज मागे पडत आहेत

Rahul Dravid : टी-२० मध्ये फलंदाजी खूप पुढे; गोलंदाज मागे पडत आहेत

0
Rahul Dravid : टी-२० मध्ये फलंदाजी खूप पुढे; गोलंदाज मागे पडत आहेत

IPL 2026 : टीम इंडियाचे माजी मुख्य कोच आणि दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी टी-२० क्रिकेटमधील बदलत्या खेळ पद्धतीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या मते, टी-२० क्रिकेटमुळे फलंदाजांची कामगिरी झपाट्याने सुधारत आहे. गोलंदाज मात्र त्या तुलनेत मागे पडत आहेत.राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारताने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२३ जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. सध्या गोलंदाजांबाबत केलेल्या त्यांच्या विधानामुळे क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे.

https://prahaar.in/2026/05/12/sunetra-pawar-sunetra-pawar-handed-over-the-leadership-of-the-party-to-both-her-sons-2/

नेमकं काय म्हणाले राहुल द्रविड?

राहुल द्रविड यांनी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, प्रियांश आर्य आणि अभिषेक शर्मा यांसारख्या फलंदाजांनी टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकली आहे. त्यांच्या मते, फलंदाज आता मैदानाच्या सर्व भागात मोठे फटके आणि षटकार मारण्याची क्षमता दाखवत आहेत. त्यामुळे टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजीचे वर्चस्व वाढताना दिसत आहे. पण भविष्यात गोलंदाजही आपल्या खेळात बदल करतील आणि पुन्हा एकदा गोलंदाजीचे वर्चस्व निर्माण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कसोटी क्रिकेटमध्ये एकेकाळी फलंदाज कधी आक्रमक तर कधी संथ खेळून सामन्याच्या निकालावर प्रभाव टाकायचे. आता गोलंदाज कसोटी सामन्यांवर प्रभाव टाकू लागल्याचे दिसत आहे. अनेक कसोटी सामन्यांमध्ये ३० – ४० विकेट्स जाऊ लागल्या आहेत. हळू हळू टी-२० क्रिकेटमध्येही फलंदाजांप्रमाणेच गोलंदाज प्रभावी ठरतील, असा विश्वास राहुल द्रविड यांनी व्यक्त केला.

युरोपियन टी-२० लीगमध्ये संघाचे मालक

राहुल द्रविड नुकतेच युरोपियन टी२० प्रीमियर लीग मधील एका संघाचे मालक झाले आहेत. त्यांनी डब्लिन गार्डियन्स या संघाची फ्रँचायझी घेतली आहे. या संघाचे नेतृत्व भारताचे माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here