PlayOff Race : आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफची शर्यत वाढली आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ५५ सामने झाले आहेत. अद्याप एकही संघ प्लेऑसाठी पात्र झाला नाही. आज (मंगळवार १२ मे २०२६) ५६ वा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना जिंकणारी टीम ही आयपीएल २०२६ मध्ये प्लेऑफसाठी पात्र होणारी पहिली टीम असेल. टॉप चार स्पॉटसाठी जोरदार लढत होत आहे. मात्र लखनऊ आणि मुंबई या दोन टीमचे प्लेऑफचे आव्हान संपुष्टात आले आहे.
https://prahaar.in/2026/05/12/tim-david-bcci-takes-strict-action-against-tim-david-possibility-of-ban-from-the-season/
आज गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद असा सामना रंगणार आहे. प्लेऑफच्या पात्रतेसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊ प्लेऑफसाठी कोणत्या संघाला किती गुणांची गरज आहे ? आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत ५५ साखळी सामना झाले आहेत, तर २४ मे ला अखेरचा ७० वा साखळी सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या प्लेऑफची सुरुवात २६ मे पासून होणार आहे. यामुळे सामने आणखी रंगतदार होत आहेत. आता कोणत्या संघाला किती सामने जिंकण्याची आवश्यकता आहे ते जाणून घेऊया…

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू : रजत पाटीदारच्या नेतृत्वात आरसीबीने यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. संघाने ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. ते १४ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत. आरसीबीला राहिलेल्या तीन सामन्यात फक्त एक सामना जिंकण्याची गरज आहे.
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्सच्या नेतृत्वात हैदराबादने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. यात संघाने ७ सामने जिंकले आहेत. हैदराबादला प्लेऑफकरिता पात्र होण्यासाठी उर्वरित तीन सामन्यात एक सामना जिंकण्याची गरज आहे. सध्या हैदराबाद गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
गुजरात टायटन्स : यंदाच्या हंगामात गुजरातचे नेतृत्व शुभमन गिल करीत आहे. त्याच्या नेतृत्वात संघाने ११ पैकी सात जिंकले आहेत आणि १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. उरलेल्या तीन सामन्यात गुजरातला एक सामना जिंकण्याची गरज आहे.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबने हंगामाची सुरुवात चांगली केली होती. मात्र सलग चार पराभवांनंतर पंजाब अडचणीत आहे. पंजाबने ११ पैकी सहा सामने जिंकले आहेत. पंजाबला उरलेल्या तीन पैकी दोन सामने जिंकण्याची गरज आहे. पंजाब सध्या गुणतालिकेत १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात सीएसकेने हंगामाची सुरुवात निराशाजनक केली होती, मात्र संघाने हंगामात पुनरागमन केले आहे. सीएसकेने ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत. संघ १२ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. उरलेल्या तीन पैकी सीएसकेला दोन सामने जिंकण्याची गरज आहे.
राजस्थान रॉयल्स : रियान परागच्या नेतृत्वात राजस्थानने आतापर्यंत ११ पैकी सहा सामने जिंकले आहेत. राजस्थान १२ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. त्यांना पुढच्या तीन सामन्यांत दोन जिंकण्याची गरज आहे.
दिल्ली कॅपिटल्स : अक्षर पटेलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीसाठी यंदाचा हंगाम चढउताराचा राहिला आहे. त्यांनी १२ पैकी ६ सामने जिंकून १० गुणांसह गुणतालिकेत सातवे स्थान पटकावले आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना उर्वरित दोन्ही सामने जिंकावे लागतील आणि इतरांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
कोलकाता नाईट राईड्रस : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकताने दहा पैकी चार सामने जिंकले आहेत. ते ९ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. संघाला प्लेऑफचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी उर्वरित चारही सामने जिंकावेच लागतील