Home ताज्या घडामोडी BMC च्या सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये शेवया, पापड, कुरडई, लोणची, सांडगे, मसाले, सुक्की मच्छी खरेदीची सुवर्णसंधी

BMC च्या सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये शेवया, पापड, कुरडई, लोणची, सांडगे, मसाले, सुक्की मच्छी खरेदीची सुवर्णसंधी

0
BMC च्या सर्व वॉर्ड ऑफिसमध्ये शेवया, पापड, कुरडई, लोणची, सांडगे, मसाले, सुक्की मच्छी खरेदीची सुवर्णसंधी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वाळवण महोत्सवाचे सोमवारी ११ मे २०२६ रोजी महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड ऑफिस) उद्घाटन करण्यात आले. पहिल्या दिवशी या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला. मंगळवारी १२ मे २०२६ पर्यंत हा वाळवण महोत्सव सुरू राहणार आहे. महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, सहायक आयुक्त योगेश देसाई, सहायक आयुक्त समरिन सैय्यद यांच्याकडून महिला बचत गटांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. या महोत्सवामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या शेवया, पापड, कुरडई, लोणची, सांडगे, मसाले, सुक्की मच्छी तसेच इतर पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

https://prahaar.in/2026/05/11/mumbaikars-use-water-sparingly-10-percent-water-cut-from-friday-may-15/

मुंबई महानगरपालिकेने महिला सशक्तीकरणासाठी महानगरातील महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून विविध योजना अंमलात आणल्या आहेत. याच अनुषंगाने बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी, यासाठी वाळवण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे, संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी जी उत्तर आणि एस या प्रशासकीय विभागांमधील वाळवण महोत्सवाला सोमवारी ११ मे २०२६ रोजी भेट देऊन महोत्सवाची पाहणी केली.

https://prahaar.in/2026/05/11/global-trade-research-initiative-think-tank-supports-modis-appeal-to-avoid-buying-gold/

महिला बचत गटांनी सादर केलेल्या विविध पारंपरिक वाळवण पदार्थांचे प्रदर्शन, विक्री व्यवस्था आणि उत्पादनांची गुणवत्ता यांची मीनल तुर्डे यांनी माहिती घेतली. बचत गटांच्या महिलांशी संवाद साधत त्यांच्या मेहनतीचे आणि उद्योजकतेचे तसेच पाक कौशल्याचे कौतुक केले. महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत अशा उपक्रमांमुळे महिलांना आर्थिक बळ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला सक्षमीकरणाला चालना देतानाच पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून होत असल्याची भावना तुर्डे यांनी व्यक्त केली. महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. महोत्सवामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या शेवया, पापड, कुरडई, लोणची, सांडगे, मसाले, सुक्की मच्छी तसेच इतर पारंपरिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.