– ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील आरोपी निदा खानच्या समर्थनावरून ‘एमआयएम’वर टीका
मुंबई : नाशिकमधील टीसीएस कंपनीत घडलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील आरोपी निदा खानचे समर्थन करणाऱ्या ‘एमआयएम’वर मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शनिवारी जोरदार प्रहार केला. “हिंदू मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या निदा खानसारख्या आरोपीला वाचवण्यासाठी काही राजकीय पक्ष आणि संघटना उघडपणे मैदानात उतरल्या आहेत. अशा जिहादला समर्थन देणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता निवडणूक आयोगाने तातडीने रद्द केली पाहिजे,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
https://prahaar.in/2026/05/10/shaina-nc-the-new-chairperson-of-the-state-womens-commission/
पण दुसरीकडे, नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद घडवून हिंदू तरुणींचे धर्मांतर करण्यात आले. हे दुष्कर्म करणाऱ्या निदा खानला वाचवण्यासाठी हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी, एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि छत्रपती संभाजी नगरमधील स्थानिक नगरसेवक सक्रिय झाले आहेत. एका गुन्हेगाराला आश्रय देण्याचे काम या पक्षाकडून होत आहे. ज्या पक्षाचा नगरसेवक धर्मांतर प्रकरणातील आरोपीला आसरा देतो, अशा पक्षांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,” असेही राणे म्हणाले.
https://prahaar.in/2026/05/09/train-services-between-thane-and-vashi-will-remain-suspended-for-five-hours-while-central-railway-will-also-observe-a-mega-block-on-sunday/