मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मांडलेले सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज महानगरपालिका सभागृहात सुचवलेल्या सुधारणांसह शुक्रवारी ८ मे २०२६ रोजी मंजूर झाले. या मंजूर अर्थसंकल्पानुसार, महानगरपालिका सदस्यांना विकास कामांकरिता द्यावयाचा निधी महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ सॅप प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये आणि महानगरपालिका सभेमध्ये नगरसेवकांनी सुचवलेल्या नागरी सेवा सुविधा आणि स्थानिक विकास कामांना गती मिळणार आहे.
https://prahaar.in/2026/05/10/the-municipal-corporations-vision-of-events-in-mumbai-has-become-dim-the-quality-of-the-video-wall-in-the-emergency-control-room-has-deteriorated/
महानगरपालिका सभेमध्ये देखील १२ दिवसाच्या चर्चेनंतर ३० एप्रिल २०२६ रोजी अर्थसंकल्पातील उत्पन्नाची बाजू मंजूर करण्यात आली. तर ८ मे २०२६ रोजी उपसूचनांसह खर्चाची बाजू मंजूर करण्यात आली. अशा रीतीने संपूर्ण अर्थसंकल्पास सुधारणांसह महानगरपालिका सभेने मंजुरी दिली आहे. आजवरच्या नियमित प्रक्रियेनुसार अर्थसंकल्प आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मंजूर होणे अपेक्षित असते. तरीही, यंदा निवडणुका व त्यानंतरच्या प्रक्रियांमुळे अर्थसंकल्प मंजुरीस अधिक कालावधी लागला.
https://prahaar.in/2026/05/10/major-oil-spill-in-the-sea-near-kharg-island-global-markets-are-in-turmoil-amid-tensions-in-hormuz/