Home ताज्या घडामोडी महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने

महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने

0
महिला व बाल विकास विभागातील बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने

मुंबई: महिला व बाल विकास विभागातील सर्व पदांच्या बदल्या आता केंद्रित ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिली आहे.

या निर्णयामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता वाढणार असून कर्मचाऱ्यांना अधिक सुलभ आणि न्याय्य पद्धतीने बदलीची संधी उपलब्ध होणार आहे.
विभागातील बदल्या डिजिटल प्रणालीद्वारे केल्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान, पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहेत. तसेच, बदली प्रक्रियेत गुणवत्ता, सेवाज्येष्ठता, प्राधान्यक्रम आणि नियमांचा वस्तुनिष्ठ पद्धतीने विचार केला जाणार आहे.राज्यशासन विविध विभागांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर वाढवत असून महिला व बाल विकास विभागातही डिजिटल प्रशासनाला प्राधान्य दिले जात आहे.

https://prahaar.in/2026/05/09/thalapathy-vijay-will-take-the-oath-as-the-chief-minister-of-tamil-nadu-on-sunday-morning/#google_vignette

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here