Home ब्रेकिंग न्यूज Hutatma Smarak Chowk : हुतात्मा स्मारक चौकाच्या वास्तूची दुरवस्था, सुशोभीकरणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला भाजपने दाखवला आरसा

Hutatma Smarak Chowk : हुतात्मा स्मारक चौकाच्या वास्तूची दुरवस्था, सुशोभीकरणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला भाजपने दाखवला आरसा

0
Hutatma Smarak Chowk : हुतात्मा स्मारक चौकाच्या वास्तूची दुरवस्था, सुशोभीकरणाच्या मुद्दयावरून राजकारण करणाऱ्या काँग्रेसला भाजपने दाखवला आरसा
HUtatma Smarak Chowk

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

हुतात्मा स्मारकाच्या (Hutatma Smarak Chowk) सुशोभिकरणाच्या मुद्दयावरून महापालिका सभागृहात चांगलीच गरमागरमी झाली. या हुतात्मा स्मारकाच्या काही भागाची दुरुस्ती करून अवतीभवतीचा परिसर सुशोभिकरण करण्याची मागणी उबाठाच्या नगरसेवकांने करताच काँग्रेसने याचे सुशोभिकरण न केल्यास विरोधक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. यावर भाजपने काँग्रेसला आरसा दाखवून ज्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्र मिळू नये यासाठी प्रयत्न केला आणि मराठी माणसांच्या अंगावर गाडी चालवून लाठी हल्ला केला त्यांनी आम्हाला आंदोलनाचा इशारा देवू नये. आणि याच काँग्रेस पक्षाचे समर्थन काँग्रेस पक्षाला घेण्याची गरज कशी भासली असा सवाल विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

https://prahaar.in/2026/05/09/ruling-party-delivers-checkmate-to-opposition-approves-by-majority-a-proposal-previously-rejected-on-priority-grounds/

मुंबई महापालिका सभागृहात उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी हुतात्मा स्मारकाच्या काही लाद्या उखडलेल्या असून त्यांची दुरुस्ती व्हावी आणि त्यांच्या अवती भवतीचा परिसर सुशोभित व्हावा मागणी हरकतीच्या मुद्दयाद्वार केली. याला पाठिंबा देतानाच काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी एवढा मोठा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेला हुतात्मा स्मारकाची डागडुजी करता येत नाही हे दुर्देवी असून जर हुतात्मा स्मारकाचे नुतनीकरण न केल्यास विरोधक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. यावर किशोरी पेडणेकर यांनी हुतात्मा स्मारकाचे वास्तूचे सांधे निखळले असून पावणे चार वर्ष प्रशासन होते तेव्हा त्यांनी काय केले असा सवाल केला. तसेच आम्हा नगरसेवकांना दिलेले २५ लाख रुपये परत घ्या पण याचा विकास करावा असे सांगत स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला. यावर शिवसेनेचे अमेय घोले यांनी काँग्रेसचे हे बेगडी प्रेम असून जो काँग्रेस पक्ष मुंबईसह महाराष्ट्र मिळू नये म्हणून प्रयत्न करत होता, त्यांनी आम्हाला या हुतात्मा स्मारकाबाबत बोलू नये. आणि हुतात्मा स्मारकाचे काम प्रशासन निश्चितच करेल असेही सांगितले. याचा समाचार घेताना स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण व्हायलाचे किंबहुना ते होईलच. कुणीही या विरोधात नसेल, परंतु काँग्रेस आज जी भूमिका मांडत आहे ते त्यांचे पुतना मावशीचे प्रेम आहे. या संयुक्त महाराट्र लढ्यासाठी हुतात्मा केले कोणी, त्यांच्या गोळ्या झाडल्या कुणी असा सवाल आज आपण या सभागृहात ताठ मानेने बसतो तो याच हुतात्म्यांच्या बलिदानामुळे. काँग्रेसने आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान शिकवू नये. त्यामुळे या स्मारक चौकाचे काम होणारच असेही त्यांनी सांगितले.

यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी हा मुद्दा मराठी माणसांच्या भावनेशी निगडीत आहे. पण उबाठा, काँग्रेसचे समर्थन या विषयासंदर्भात घ्यावे लागते हे दुर्दैव आहे. यावर महापौर रितू तावडे यांनी मराठी माणसांच्या बलिदानामुळे आज ही मुंबई उभी आहे. त्यामुळे या पवित्र हुतात्मा चौकाच्या सुशाेभिकरणाच्या कामांचा अहवाल बनवून निधीच्या तरतुदीसह तयार करून पुढील सभेत सादर केला जावा असे निर्देश महापौरांनी देत हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here