Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Board 10th Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग पुन्हा अव्वल, छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी

Maharashtra Board 10th Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग पुन्हा अव्वल, छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी

0
Maharashtra Board 10th Result 2026 : दहावीचा निकाल जाहीर; कोकण विभाग पुन्हा अव्वल, छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी
SSC result

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९२.०९ टक्के लागला असून, १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली आहे.

https://prahaar.in/2026/05/08/pcod-clinic-in-government-hospitals/

विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अधिक वेळ मिळावा, यासाठी यंदा दहावीची परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस आधीच घेण्यात आली होती. राज्यभरात ६४ विविध विषयांची परीक्षा पार पडली. मंडळाच्या माहितीनुसार, परीक्षा शांत, शिस्तबद्ध आणि निकोप वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे, ६४ पैकी २० विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

निकालाच्या आकडेवारीनुसार, मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ९४.९६ इतका नोंदवण्यात आला आहे, तर मुलांचा निकाल ८९.५६ टक्के लागला. त्यामुळे मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत ५.४० टक्क्यांनी अधिक ठरला आहे.

https://prahaar.in/2026/05/08/pune-illegal-schools/

दरम्यान, विभागनिहाय निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल ९७.६२ टक्के लागला असून, तो राज्यातील सर्वाधिक आहे. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८८.४१ टक्के नोंदवण्यात आला आहे.

कोकण– ९७.६२%
कोल्हापूर– ९५.४७%
मुंबई– ९४.९७%
पुणे– ९४.२४%
नाशिक– ९०.९३%
अमरावती– ९०.५०%
नागपूर– ८९.०७%
लातूर– ८८.४२%
छत्रपती संभाजीनगर– ८८.४१%

राज्याचा एकूण निकाल– ९२.०९%