मुंबई : आयपीएल २०२६ च्या ४७ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा सहा विकेट राखून पराभव केला. या विजयामुळे सहा गुणांसह मुंबई गुणतालिकेत नवव्या स्थानी कायम आहे तर लखनऊ चार गुणांसह दहाव्या स्थानी आहे. या सामन्यात मुंबईच्या विजयापेक्षा रघु शर्माने विकेट घेतल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनची चर्चा जास्त होत आहे.
https://prahaar.in/2026/05/05/dc-vs-csk-delhi-vs-csk-face-off-today-in-ipl-waiting-for-dhonis-comeback-delhi-has-a-chance-to-avenge-the-previous-defeat/
नेमकं चिठ्ठीत काय लिहिले होते ?
सामन्यामधील दुसऱ्या डावाच्या तिसऱ्या षटकात रघुने पहिल्याच चेंडूवर अक्षतला बाद करत सेलिब्रेशन केले होते. रघुने अक्षतला बाद केल्यानंतर आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढून मुंबईच्या डगआऊटच्या दिशेनं दाखवली. रघुने चिठ्ठीत काय लिहिलं आहे हे पाहण्यासठी कर्णधार सूर्यकुमार यादवही अगदी वाकून पाहत होता. या चिठ्ठीमधील मजकूर थोड्या वेळात उघडकीस आला.गुरुदेवांच्या कृपेने, अत्यंत वेदनादायी अशी १५ वर्षे आज संपुष्टात आली. मला ही संधी दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे आभार. मी सदैव ऋणी राहीन. जय श्री राम, असा मजकूर या चिठ्ठीत होता.
https://prahaar.in/2026/05/05/ipl-2026-mi-vs-lsg-mumbai-regained-their-rhythm-after-rohits-comeback-won-by-6-wickets-over-lucknow/
This is what was written on Raghu Sharma’s paper:
“A very painful 15 years by divine mercy of gurudeva ended today. Thanks Mumbai Indians (Blue and Gold) for giving me this opportunity. Ever grateful. Jai Shri Ram”. pic.twitter.com/SjP4ippvxP
— R A T N I S H (@LoyalSachinFan) May 4, 2026
कोण आहे हा रघु शर्मा ?
रघु शर्मा हा प्रामुख्याने उजव्या हाताने लेग-ब्रेग गोलंदाजी करतो. पंजाबमध्ये जन्मलेला रघु हा देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये पंजाब, पुद्दुचेरी आणि उत्तराखंड या संघांचे प्रतिनिधित्व करतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५७ विकेट्स घेतल्या असून ७/५६ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तो एक कंडिशनिंग ट्रेनर देखील आहे. त्याला मुंबईने २०२५ च्या आयपीएमध्ये जखमी खेळाडू विघ्नेश पुथुरच्या जागी संघात सहभागी झाला होता. सध्या तो त्याच्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आला आहे .