मुंबई : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मिळालेला ऐतिहासिक विजय हा अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी दिली. मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. तसेच, या विजयाचा जल्लोष न करता कार्यकर्त्यांनी संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.
बारामतीकरांनी दाखवलेला हा विश्वास म्हणजे अजितदादांच्या विकासकामांवरील अढळ श्रद्धा असल्याचे त्या म्हणाल्या. “बारामतीकरांना अशी पोटनिवडणूक नकोच होती; परंतु परिस्थितीमुळे ती झाली. या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी दादांविषयीची आपली खरी भावना व्यक्त केली आहे,” असे सांगत सुनेत्रा पवार भावूक झाल्या.
https://prahaar.in/2026/05/04/baramati-election-sunetra-pawar-sunetra-pawar-sets-a-world-record-in-baramati/
शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आजवर केलेल्या कामाची आणि सेवेची पोचपावती मतदारांनी आपल्या मतांतून दिली आहे. बारामती हे माझे कुटुंब असून, अजितदादांनी दाखवलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, शरद पवारांनी सुरुवातीलाच उमेदवार न देण्याची घेतलेली भूमिकाही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
https://prahaar.in/2026/05/04/minister-ashish-shelar-an-alliance-with-ubt-guarantees-defeat/
ही नव्या बारामतीची सुरुवात
मतदारांनी दाखवलेल्या या प्रचंड विश्वासाने आपल्यावरील जबाबदारी वाढल्याचे सांगत सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांना माझी नम्र विनंती आहे की, कुणीही मिरवणुका काढू नका किंवा गुलाल उधळू नका. आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साजेसे वर्तन करूया. हा शेवट नाही, तर निर्धाराची, संघर्षाची आणि नव्या बारामतीची सुरुवात आहे.”