पुणे / अहिल्यानगर : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत तर अक्षय कर्डिले राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत लाखोंच्या मताधिक्याने विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या सुनेत्रा पवार आणि भाजपचे उमेदवार असलेले अक्षय कर्डिले या दोघांच्या दणदणीत विजयामुळे महायुतीने आपल्या दोन्ही जागा राखल्या आहेत. याआधी अजित पवार बारामतीचे तर शिवाजीराव कर्डिले राहुरीचे आमदार होते. पण त्यांच्या निधनामुळे बारामती आणि राहुरी मतदारसंघ रिक्त झाले होते. यामुळेच दोन्ही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली.
https://prahaar.in/2026/05/04/devendra-fadnavis-the-victory-in-west-bengal-belongs-to-every-nationalist-citizen-of-the-country/
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटननिवडणुकीत राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सुनेत्रा अजित पवार यांना दोन लाख अठरा हजार ९६९ मते मिळाली. सुनेत्रा पवारांचा २४ फेऱ्यांअखेर दोन लाख अठरा हजार ०३४ मतांनी विजय झाला. त्यांनी नवीन राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रो. आर. वाय. घुटुकडे सर यांचा पराभव केला. प्रो. आर. वाय. घुटुकडे सर यांना फक्त ९३५ मते मिळाली. तेच या निवडणुकीतले दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. बारामतीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आणि करुणा धनंजय मुंडे हे पण रिंगणात होते. बिचुकले यांना ३३३ तर करुणा धनंजय मुंडे यांना ३०१ मते मिळाली.
https://prahaar.in/2026/05/04/certificate-of-unopposed-election-for-9-candidates-of-suicide-prevention-council/
राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटननिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना एक लाख चाळीस हजार ०९३ मते मिळाली. त्यांचा २७ फेऱ्यांअखेर एक लाख बारा हजार ५८७ मतांनी विजय झाला. त्यांनी गोविंद खंडू मोकाटे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अर्थात राशपच्या उमेदवाराचा पराभव केला. गोविंद मोकाटे यांना २७ हजार ५०६ मते मिळाली. तेच या निवडणुकीतले दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले.
https://prahaar.in/2026/05/04/nashik-metropolitan-region-development-authoritys-budget-of-rs-236-crore-approved/
आसाम, पुदुच्चेरी, पश्चिम बंगालमध्ये NDA ची सत्ता
- आसाम विधानसभा – एकूण जागा १२६ (१२३ जागांचे कल आणि निकाल जाहीर) – भाजप ८१ जागांवर विजयी आणि एका जागेवर आघाडी
- पुदुच्चेरी विधानसभा – एकूण जागा ३० (२६ जागांचे कल आणि निकाल जाहीर) – एआयएनआरसी १० जागांवर विजयी आणि २ जागांवर आघाडीवर तर भाजप ४ जागांवर विजयी
- पश्चिम बंगाल विधानसभा – एकूण जागा २९४ (२९२ जागांचे कल आणि निकाल जाहीर) – भाजप ११२ जागांवर विजयी आणि ९४ जागांवर आघाडीवर
- तामिळनाडू विधानसभा – एकूण जागा २३४ (२२२ जागांचे कल आणि निकाल जाहीर) – TVK ६८ जागांवर विजयी आणि ३७ जागांवर आघाडीवर
- केरळ विधानसभा – एकूण जागा १४० – काँग्रेस ६३ जागांवर विजयी