Home क्रीडा IPL IPL 2026 : प्लेऑफआधीच आरसीबीला मोठा धक्का, दिग्गज खेळाडू संघातून बाहेर…

IPL 2026 : प्लेऑफआधीच आरसीबीला मोठा धक्का, दिग्गज खेळाडू संघातून बाहेर…

0
IPL 2026 : प्लेऑफआधीच आरसीबीला मोठा धक्का, दिग्गज खेळाडू संघातून बाहेर…

लखनऊ : आयपीएल २०२६ मध्ये आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी नऊ पैकी सहा सामने जिंकून १२ गुण मिळवले आहेत. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ते फक्त तीन सामन्यात हरले आहेत. एवढी उत्तम कामगिरी करणाऱ्या आरसीबीचा पुढील सामना सात मे रोजी गुरुवारी लखनऊच्या एकाना स्टेडियमवर होणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरूद्धच्या या सामन्याआधी आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर गेला आहे.

https://prahaar.in/2026/05/04/mi-vs-lsg-mumbai-lucknow-face-to-face-at-wankhede-losing-team-will-be-out-of-the-playoff-race/

इंग्लंडचा फिल सॉल्ट आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीकडून खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध १८ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात त्याच्या बोटाला दुखापत झाली. सुरुवातीला ही दुखापत तातडीच्या उपचारांनी बरी होईल असे वाटले. पण दुखापतीचे स्वरुप गंभीर असल्याचे नंतर लक्षात आले. दिल्लीच्या फलंदाजाने चौकार मारण्यासाठी चेंडू जोरात फटकावला होता. हा चेंडू अडवण्याच्या प्रयत्नात फिल सॉल्टच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत बरी होण्यास वेळ लागणार असल्याचे लक्षात आल्यामुळे फिल सॉल्टने मायदेशी परत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

फिल संघासाठी सलामीला येत होता. त्याच्या गैरहजेरीत जेकब बेथेलला विराट कोहलीसोबत डावाची सुरुवात करण्याचे निर्देश संघ व्यवस्थापनाने दिले आहेत. जेकब बेथेल यंदाच्या हंगामात आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. त्याने त्या तीन सामन्यांत फक्त ३९ धावा केल्या आहेत. फिल सॉल्टने जखमी होण्याआधी १६८.३३ स्ट्राइक रेटने २०० धावा केल्या होत्या. मुंबई विरुद्ध ७८ धावंची खेळी ही त्याची या हंगामातील सर्वोत्तम खेळी होती. पण दुखापतीमुळे आता फिल यंदाच्या हंगामात पुढे खेळू शकणार नाही हे निश्चित झाले आहे. यामुळे आरसीबीच्या फलंदाजीच्या नियोजनाला मोठा धक्का बसला आहे.