देशातील आजवरचे सर्वाधिक मताधिक्य; राहुरीत अक्षय कर्डिले यांचाही दणदणीत विजय
मुंबई : बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून, महायुतीने एक नवा इतिहास रचला आहे. बारामतीमध्ये महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवत भारतीय लोकशाहीच्या इतिहासात एका अभूतपूर्व विक्रमाची नोंद केली आहे. दुसरीकडे, राहुरीमध्येही भाजपचे युवा नेतृत्व अक्षय कर्डिले यांनी एकतर्फी विजय मिळवत विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळवले आहेत.
https://prahaar.in/2026/05/04/minister-ashish-shelar-an-alliance-with-ubt-guarantees-defeat/
https://prahaar.in/2026/05/04/pandharpur-corridor-pandharpur-corridor-finally-approved/
दुसरीकडे, सुनेत्रा पवार यांना आव्हान देणाऱ्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. अपक्ष उमेदवार करुणा मुंडे यांना ६८ मते आणि अभिजीत बिचुकले यांना ६५ मते मिळाली. विशेष म्हणजे नोटा या पर्यायापेक्षाही (१५३ मते) कमी मते त्यांना मिळाली आहेत.
राहुरीत कर्डिलेंचे निर्विवाद वर्चस्व
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले यांनी एकतर्फी विजय मिळवला. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांचा तब्बल १ लाख ११ हजार ८२६ मतांनी पराभव केला. अक्षय कर्डिले यांना १ लाख ३९ हजार २१२ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी गोविंद मोकाटे यांना केवळ २७ हजार ३८६ मतांवर समाधान मानावे लागले.