कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांची वेळ आता जवळ आली आहे. सोमवारी राज्यातील २९३ जागांवर (फाल्टा वगळून) होणारी मतमोजणी पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी निवडणूक आयोगाने पूर्ण ताकद लावली आहे. आयोगाने शनिवारी काउंटिंग ऑब्झर्व्हरची अधिकृत यादी जाहीर केली असून त्यानुसार एकूण ४३२ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आयोगाच्या यादीनुसार, यावेळी उत्तर २४ परगणा जिल्हा मतमोजणीच्या केंद्रस्थानी राहणार आहे. येथे ३३ जागांसाठी सर्वाधिक ४९ काउंटिंग ऑब्झर्व्हर नेमण्यात आले आहेत. त्यानंतर दक्षिण २४ परगणा जिल्ह्याचा क्रमांक लागतो, जिथे ३१ जागांसाठी ४५ निरीक्षकांची मोठी टीम तैनात करण्यात आली आहे. मात्र, फाल्टा मतदारसंघातील मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे या संख्येत थोडाफार बदल होण्याची शक्यता आहे.
https://prahaar.in/2026/05/02/west-bengal-election-2026-evm-controversy-erupts-re-voting-begins-at-15-centers-in-bengal-allegations-of-covering-buttons-with-tape/
https://prahaar.in/2026/04/30/west-bengal-election-2026-more-than-92-percent-voting-in-two-phases/
मतमोजणी केंद्रांच्या बाहेरील सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी ७७ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की हे पोलीस निरीक्षक कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी कक्षात प्रवेश करणार नाहीत. त्यांचे काम बाहेरील परिसरात समन्वय साधणे आणि सुव्यवस्था राखणे हे असेल.