Home क्राईम Crime News : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडल्या; मातेने केली चार मुलांची हत्या

Crime News : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडल्या; मातेने केली चार मुलांची हत्या

Crime News : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडल्या; मातेने केली चार मुलांची हत्या
crime

उत्तर प्रदेश : क्रौर्याच्या मर्यादा ओलांडणारी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. एका मातेनेच पोटच्या चार मुलांची हत्या केली. ही धक्कादायक घटना मिरानपूर येथे घडली. पोलीस या प्रकरणी संबंधित महिलेचा शोध घेत आहेत.

https://prahaar.in/2026/05/02/nashik-argument-with-mother-reaches-climax-travel-businessman-commits-suicide-by-jumping-from-fifth-floor/

मुलांचा खून आईने केला?

नियाज त्याची पत्नी आणि चार मुले असे एक कुटुंब मिरानपूर गावात राहत होते. नियाज कामासाठी सौदी अरेबियामध्ये राहत होता, अनेक वर्षांपासून तिथे तो काम करत होता, तिथल्या एका पाकिस्तानी महिलेशी त्याने लग्न केले अशा बातम्या गावात पसरल्या होत्या. जेव्हा नियाजच्या मुलांची निर्घृण हत्या झाली तेव्हा त्यांची आई घरात नव्हती , त्यामुळेच नियाजच्या पत्नीने मुलांची हत्या केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिरानपूरमध्ये झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरला असून, पोलीस संशयित आरोपी महिलेचा शोध घेत आहेत.

https://prahaar.in/2026/05/02/another-shocking-incident-in-pune-after-dawn-brutal-murder-of-a-three-year-old-child/