मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी सुरु झाली आहे आणि बहुतेक जणांच्या नजरा या कोकणाकडे वळल्या आहेत, त्यामुळे गावच्या वाटा गजबजल्या आहेत. नेहमीचा कटकटीचा मुंबई गोवा महामार्ग आता सुखकर होणार आहे. महामार्गाचे काम पूर्ण झाले असून लवकरच आपल्या सेवेत रुजू होणार आहे.
https://prahaar.in/2026/04/30/nashik-crime-insulin-worth-82-lakhs-stolen-from-indian-armys-deolali-camp-hospital/
सुनील तटकरे काय म्हणाले
अलिबाग येथील पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे यांनी महामार्गाच्या कामांबद्दल सविस्तर माहिती दिली असून महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
इंदापूर आणि माणगाव बायपासचा कामालाही गती मिळाली असल्याचे त्यांनी नमूद केले आणि ३१ मी पूर्वी बायपासची काही कामे वगळता उर्वरित महामार्गाचे काम पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
https://prahaar.in/2026/04/30/fallout-from-fatal-incident-linked-to-watermelon-consumption-watermelon-sales-grind-to-a-halt-at-vashi-apmc-traders-and-farmers-alarmed/
कोकणातील व्यापार आणि पर्यटनाला होणार विकास
इंदापूर आणि माणगाव या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या कोकण रेल्वे आणि इतर विभागांकडून एनओसी मिळाल्या आहेत. त्यामुळे या कामांना वेग येईल आणि लवकरच ते पूर्ण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास मुंबई ते गोवा दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होणार आहे.