Home ब्रेकिंग न्यूज Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

0
Marine Drive Accident : मरीन ड्राईव्हवर पहाटे भीषण थरार! मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू
Marine Drive Accident

मुंबई : मुंबईत सोमवार, २७ एप्रिल रोजी पहाटे मरीन ड्राईव्ह परिसरात भीषण अपघात घडला असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरगाव परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक पहाटे साधारण पावणेसहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी मरीन ड्राईव्हवर आले होते. त्याच वेळी वेगाने येणाऱ्या दोन बाईकस्वारांनी त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वृद्ध व्यक्ती, एक तरुण आणि एक तरुणी अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघात इतका भीषण होता की दोन्ही बाईकस्वारही रस्त्यावर कोसळले आणि त्यांनाही गंभीर दुखापत झाली. तातडीने घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि सर्व जखमींना जीटी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

https://prahaar.in/2026/04/27/lashkar-e-taiba-terrorists-killed-one-after-another-in-pakistan-top-commander-of-lashkar-e-taiba-shot-dead/

पोलिसांनी मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून अपघात नेमका कसा घडला याचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार दोन्ही बाईक अत्यंत वेगात होत्या. कदाचित रात्रीच्या फेरफटक्यानंतर ते परतत असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच बाईकस्वारांमध्ये शर्यत सुरू होती का, याचाही तपास केला जात आहे.

दरम्यान, या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान, रविवारी रात्री मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात ब्रेक फेल झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात झाला होता. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले.