दिल्लीतील आयजीआय विमानतळावर स्विस एअरच्या एलएक्स १४७ या विमानाच्या टेकऑफदरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन आग लागल्याची घटना घडली. या घटनेत किमान ६ प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वैमानिक आणि ग्राउंड स्टाफच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
https://prahaar.in/2026/04/26/white-house-dinner-firing-shooting-during-white-house-dinner-trumps-first-reaction-after-the-incident-said/
विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सुरक्षेचे सर्व निकष पाळून संपूर्ण बचावकार्य पार पाडण्यात आले.
घटनेनंतर काही काळ धावपट्टीवरील कामकाज प्रभावित झाले होते, मात्र नंतर परिस्थिती पूर्ववत करण्यात आली. या घटनेनंतर विमान कंपनी आणि संबंधित यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांची टीम विमानाच्या ब्लॅक बॉक्ससह इतर तांत्रिक बाबींची तपासणी करत आहे. घटना घडली तेव्हा विमानाच्या आतील भागात अचानक धूर पसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, क्रू सदस्यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना शांत ठेवले आणि सुरक्षित बाहेर काढण्यात मदत केली.