Home ब्रेकिंग न्यूज Accident News : भंडाऱ्यात कुटुंबावर शोककळा; लग्नावरून परताना काळाची झडप

Accident News : भंडाऱ्यात कुटुंबावर शोककळा; लग्नावरून परताना काळाची झडप

Accident News : भंडाऱ्यात कुटुंबावर शोककळा; लग्नावरून परताना काळाची झडप
Accident News

भंडारा : लग्नाचे मुहूर्त चालू आहेत, त्यामुळे लोक आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला जात असतात. असेच एक लग्न आटोपून आलेल्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अपघात इतका भीषण होता की, एकाच कुटुंबातील व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला.

नेमकं घडलं काय?

अड्याळ येथील एक कुटुंब लग्नासाठी कोंढा कोसरा येथे गेले होते. गुरुवारी २३ तारखेला  रात्रीच्या सुमारास लग्नसमारंभ आटोपून सर्वजण व्हॅनने घरी परत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली. आपल्या गावाच्या वेशीवर पोचले असताना त्यांच्या मृत्यूच्या तोंडी जावे लागले. समोरून भंडारा पवनीच्या दिशेकडून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात ट्रकने त्यांच्या व्हॅनला जोरदार धडक दिली.

https://prahaar.in/2026/04/24/delhi-crime-rape-and-murder-of-a-girl-by-an-irs-officers-domestic-help-the-officers-error-becomes-the-girls-punishment/

कुटुंब मृत्युमुखी

ही धडक इतकी भीषण होती की व्हॅनचा चक्काचूर झाला, यामध्ये कुटुंबातील ४ महिला आणि १ पुरुष जागीच ठार झाला असून इतर ३ जण गंभीर जखमी आहेत.

https://prahaar.in/2026/04/24/everyone-sorry-the-last-message-on-mobile-status-and-what-happened-after-that-made-my-heart-tremble/

अपघाताचा मोठा आवाज होताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी ताटाकल घटनास्थळी धाव घेत. प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. परंतु ट्रॅक चालक फरार झाला असून अड्याळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.