मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत, राजांच्या अनेक गोष्टी प्रत्येक मराठी माणूस हा लहानपणापासून ऐकत आला आहे, सुरुवातीला आलेल्या राजा शिवछत्रपती या सिनेमामुळे महाराजांचे शौर्य, कर्तृत्व आपल्याला अधिक कळले, त्यानंतर थेट मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमामुळे मराठी माणसाचं रक्त खवळल. यानंतर अनेक सिनेमे आले, महाराजांच्या वेगवेळ्या बाजू, युद्धनीती, गनिमी कावा यांवर प्रकाश टाकला गेला.
आता महाराजांचा आणखीन एक सिनेमा येत आहे. रितेश देशमुख यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’, या चित्रपटाचा ट्रेलर २० एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून एका प्रसंगामुळे अनेक टीका, आरोप होत आहेत.
https://prahaar.in/2026/04/21/kolhapur-chitranagari-and-n-d-studio-will-be-utilized-for-multi-purpose-use-to-boost-revenue/
या प्रसंगामुळे झाला वाद
राजा शिवाजी या सिनेमात अनेक कलाकारांनी यात महत्वाच्या भूमिका साकारल्या असून. संजय दत्त हा अफझलखान ची भूमिका साकारली आहे.
अफझलखान वधाचा तो प्रसंग : रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट होते. अफझलखान हल्ला करण्यापूर्वीच महाराज त्याला वाघनख दाखवतात आणि वार त्याच्या मानेवर करतात.
https://prahaar.in/2026/04/21/marathi-rapper-rocksun-marathi-rapper-rocksuns-song-is-a-craze-in-hip-hop/
मूळ इतिहासात काय सांगितले आहे
टीकेची झोड
हा ट्रेलर लाँच होताच सोशल मीडियावर टीकेची झोड उठले आहेत, इतिहास रितेश देशमुख का बदलत आहेत? इतिहासाशी छेडछाड का करत आहेत? आणि चुकीचा इतिहास लोकांना का दाखवत आहेत? महाराष्ट्राच्या इतिहासाचा, वारशाचा आणि अभिमानाचा का अपमान करत आहेत? असे प्रश्न विचारले जात आहेत.
रितेश देशमुख यांचे उत्तर
रितेश देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून या टीकांचे उत्तर देत लिहिलं आहे की ‘प्लीज १ मे रोजी चित्रपट नक्की पहा… तुमच्या प्रश्नच उत्तर चित्रपटाचं आहे, मला आशा आहे की, तुम्ही तुमचे मित्र आणि कुटुंबासोबत चित्रपटाचं आनंद घ्याल. जय शिवराय