मणिपुरच्या अनेक भागांमध्ये आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ इतकी नोंदवण्यात आली असून, त्याचे केंद्र कामजोंग जिल्ह्यात होते.
https://prahaar.in/2026/04/20/india-south-korea-relations-from-chips-to-ships-india-korea-will-create-new-opportunities-together-prime-minister-narendra-modi/
सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या नुकसानीची माहिती मिळालेली नाही. यापूर्वी सोमवारी उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथे रात्री ८.३२ वाजता रिश्टर स्केलवर ३ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याचे केंद्र सुमारे १० किलोमीटर खोलीवर होते. तसेच सोमवारी सकाळी जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे समुद्रात सुमारे ८० सेंटीमीटर उंच लाटा उसळल्या आणि किनाऱ्यावर आदळल्या. त्यानंतर जपानमध्ये सुनामीचा इशाराही देण्यात आला होता.