Home ब्रेकिंग न्यूज Vasai : वसईत मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश

Vasai : वसईत मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश

0
Vasai : वसईत मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश
nitesh rane meeting

मुंबई : पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवावावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.

पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे या विषयी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते.

वसईतील केंद्रामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील यासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना ही एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या जनजागृतीसाठी शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त लाभार्थी पर्यंत ही योजना पोचवावी, अशा सूचना ही मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. यानंतर मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश गाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस पर्यटन विभागाचे सचिव संजय खंदारेही उपस्थित होते. बैठकीत मच्छी सुकविण्यासाठी जागा, जाळी व बोटी दुरुस्ती केंद्रे, कोळी खेड्यांचा विकास तसेच पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प यावर चर्चा झाली. यावेळी ‘बॅक वॉटर’ प्रकल्पाच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाकडे प्रस्ताव सादर करावा. याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांनी सर्व संबंधितांची बैठक घ्यावी असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मच्छीमार संस्थांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती देण्यात यावी. त्यासाठी शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे अशा सूचनाही मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिल्या.