Home ब्रेकिंग न्यूज Marathi Big Boss 6 Winner Tanvi Kolte : तंटा क्वीन ते टास्क क्वीन तन्वी कोलते ठरली मराठी बॉग बॉस सीझन ६ ची विजेती

Marathi Big Boss 6 Winner Tanvi Kolte : तंटा क्वीन ते टास्क क्वीन तन्वी कोलते ठरली मराठी बॉग बॉस सीझन ६ ची विजेती

Marathi Big Boss 6 Winner Tanvi Kolte : तंटा क्वीन ते टास्क क्वीन तन्वी कोलते ठरली मराठी बॉग बॉस सीझन ६ ची विजेती
tanvi kolte

मुंबई : मराठी बिग बॉसचा सीझन सुरु झाला, रितेश देशमुख यांनी या शो सूत्रसंचालन केलं, आणि बघता बघता या शोचा महाअंतिम सोहळा देखील संपन्न झाला. घरातील भांडण, मज्जा मस्ती राडे, मनोरंजन, खेळ या सगळ्यात ११ खेळाडूंची कसोटी पणाला लागली. भाऊंच्या धक्क्यावर कधी ओरडा तर कधी कौतुकाचा वर्षांव झाला.

एक एक टप्पा पार करताना अनेक खेळाडूंना त्यांचा प्रवास तिथेच थांबवावा लागला. आणि टॉप ५ मध्ये पोहोचले तन्वी कोलते, राकेश बापट, दीपाली सय्यद, अनुश्री माने, विशाल कोटियन.

तन्वी कोलते जिंकली मराठी बिग बॉस

खेळाच्या मांडणीनुसार रितेश देशमुख टॉप ५ स्पर्धकांना एक्टिव्हिटी रूममध्ये बोलावून प्रत्येकाला स्वतःला एलिमिनेट करण्याची संधी दिली , स्वतःला एलिमिनेट कराल तर ५ लाखांचा धनादेश असे त्याने सांगितले पण कोणीही बझर दाबला नाही त्यामुळे रितेशने प्रेक्षकांनी दिलेल्या वोटींगनुसार एलिमिनेशन केलं. सर्वात आधी दीपाली एलिमिनेट झाली त्यानंतर अनुश्री माने आणि मग टॉप ३ होते तन्वी कोलते, राकेश बापट आणि विशाल कोटियन यांच्यात नंतर विशाल बाद झाला.

https://prahaar.in/2026/04/18/bigg-boss-marathi-6-a-celebration-of-drama-tasks-and-twists-5-unforgettable-moments-from-bigg-boss-marathi-6/

तन्वी कोलते ठरली विजयी

बिग बॉसच्या घरात असताना आपणच या घराचे शेवटी जाताना दिवे बंद करायचे असे स्वप्न राकेश आणि तन्वीने पहिले होते. ते काल सत्यात उतरले आणि तन्वी कोलते मराठी बिग बॉस सीजन ६ ची विजेती ठरली.

तन्वीला हे बक्षीस मिळाले

तन्वी विजेती ठरली आणि तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला. मराठी बिग बॉस सीजन ६ कडून तिला १५ लाखांचा धनादेश, तुनवाल स्कूटर, पु. ना. गाडगीळ यांच्यातर्फे रेवा डायमंड ज्वेलरी खरेदी करण्यासाठी १० लाखाचं व्हावचार मिळाला आहे

https://prahaar.in/2026/04/19/sachin-pilgaonkar-and-madhurani-gokhale-reunite-after-22-years-in-the-film-kapuskonda/

दरम्यान बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये हे स्पर्धक सहभागी झाले होते. राकेश बापट, दीपाली सय्यद, तन्वी कोलते, विशाल कोटियां, अनुश्री माने, सचिन कुमावत, सागर कारंडे, ओमकार राऊत, आयुष्य संजीव, राधा मुंबईकर, रुचिता जामदा, सोनाली राऊत, प्राजक्ता शुक्रे, कारण सोनावणे, दिव्या शिंदे, प्रभू शेळके, त्यानंतर वाइल्ड कार्ड एन्ट्री मधून राखी सावंत, संकेत पाठक, रेवा कौरसे, आणि संस्कृती शेळके हे सदस्य सामील झाले होते.