नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात आणि TCS कंपनी नंतर नाशिक आणखी एक कारणाने चर्चेत आहे ते म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा या कुंभमेळ्यासाठी गोदावरीच्या काठावर १२ नवीन घाट, ४०० एकर जागा आरक्षित करणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे आजपासून पुढील तीन महिने शहरातील द्वारका सर्कल बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
https://prahaar.in/2026/04/19/ashok-kharat-case-sit-investigation-increases-bhondubaba-kharats-problems-police-custody-extended-again/
द्वारका चौक ३ महिने बंद
नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा सुरु होणार आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांनी वेग धरला आहे. कुंभमेळा सुरु होण्याच्या आधी सगळी कामे पूर्ण व्हावीत असा हेतू आहे. त्यामुळे नाशिकचे प्रवेशद्वार समजला जाणारा ‘द्वारका सर्कल’ आजपासून पुढील तीन महिन्यांसाठी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. १८ जुलै पर्यंत हा परिसर निर्बंधाखाली राहणार असून, यामुळे नाशिकरांसह महामार्गावरील प्रवाशांची अडचणीत वाढ होणार आहे.
https://prahaar.in/2026/04/19/ayan-ahmed-and-uzer-there-was-a-financial-dispute-between-ayan-ahmed-and-uzer/
द्वारका सर्कल वरील कायमस्वरूपी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अंडरपासचे काम संथगतीने सुरु होते. मात्र कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनसमोर असल्याने आता या कामाला युद्धपातळीवर गती दिली जात आहे.
दरम्यान मुंबई – आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्गावरून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असून नागरिकांनी त्याचा वापर करावा असे प्रशासनसह आवाहन करण्यात आले आहे.