Home ब्रेकिंग न्यूज Maharashtra Weather alert : महाराष्ट्रात रविवारी अवकाळी मुसळधार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Weather alert : महाराष्ट्रात रविवारी अवकाळी मुसळधार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Weather alert : महाराष्ट्रात रविवारी अवकाळी मुसळधार; या जिल्ह्यांना अलर्ट जारी
maharashtra weather

मुंबई : देशाच्या हवामानातं अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. काही राज्यात पाऊस, गारपीठ तर काही ठिकाणी कडाक्याचं ऊन पडलेलं आहे, वातावरणचा समतोल बिघडत असल्याने याचा थेट परिणाम जीवसृष्टी वर होताना पाहायला मिळत आहे. कडकी उन्हात उष्माघाताने बळी जात आहेत. तर कुठे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होताना पाहायला मिळत आहे.

अशातच १९ एप्रिल रोजी  महाराष्टात दुहेरीस संकट उध्दभवणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही जिल्ह्यांसाठी अलर्ट देखील जरी करण्यात आले आहेत.

https://prahaar.in/2026/04/19/crime-news-youth-murdered-with-a-machete-over-a-past-dispute-two-suspects-detained/

पश्चिम महाराष्ट्रावर संकट

पश्चिम महाराष्ट्राच्या वेशीवर पुन्हा एकदा अबकाली पावसाचं संकट घोंगावत आहे. पुणे, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पून्हा एकदा अवकाळी पावसाच्या सराई कोसळणार आहेत. त्यामुळे या भागाला यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम प्रकारचा पाऊस असण्याची शक्यता आहे. शिवाय नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. मराठवाड्यात देखील अवकाळी आपली हजेरी लावणार आहे. बीड हिंगोली, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांनाही पावसाचा यल्लो अलर्ट जारी केला असून टायचा परिणाम शेतीवर होणार आहे.

https://prahaar.in/2026/04/16/maharashtra-weather-heatwave-to-intensify-in-maharashtra-while-showers-are-set-to-lash-these-states/

विदर्भात उन्हाचा तडाखा आणखी वाढणार

अकोला अमरावती, वर्ष या भागात येत्या काही दिवसात वातावरणात उष्णता पतचंद वाढणार असून नागरिकांनी नियोजन करूनच घराबाहेर पडावे, दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी योग्य य्त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

शिवाय कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नसला तरी हलका ते मध्यम पाऊस आणि वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.