Home ब्रेकिंग न्यूज Ayan Ahmed and Uzer : अयान अहमद व उजेरमध्ये होता पैशाचा वाद

Ayan Ahmed and Uzer : अयान अहमद व उजेरमध्ये होता पैशाचा वाद

Ayan Ahmed and Uzer : अयान अहमद व उजेरमध्ये होता पैशाचा वाद
Ayan Ahmed and Uzer

अमरावती : परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू झाल्यानंतर आता तपासात नवनवीन तथ्ये पुढे येत आहेत. कटातील मुख्य सूत्रधार अयान अहमद व उजेर खान इक्बाल खान या दोघांमध्ये पैशाचा वाद सुरू होता. त्यातून उजेरने अयानच्या मोबाईलमधील डेटा स्वत:कडे घेतला, अशी कबुली सूत्रधार अयानने एसआयटीच्या तपास पथकापुढे दिली. लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून परतवाडा ठाण्यात पोक्सो, सार्वजनिक बदनामी केल्याप्रकरणी अयान व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ४२ सदस्यीय एसआयटीकडे वर्ग करण्यात आला. सुरवातीला पाच दिवस कोणतिही पीडित पोलिसांकडे जबाब नोंदविणे किंवा तक्रार देण्याकरिता आलेली नव्हती. अखेर नजीकच्याच जिल्ह्यातील एक अल्पवयीन पीडित पोलिसांपर्यंत पोहोचली. पीडित ही अल्पवयीन असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तिच्या जबाबातून जी फॅक्ट पुढे येईल, त्यानुसार पुढील कारवाई केल्या जाईल, असेही त्यांनी सांगितले. अयानचे पैसे उजेरने घेतले होते. त्यानंतर उजेरनेच अयानच्या मोबाईलमधील डेटा स्वत:कडे घेऊन तो इतरांना फॉरवर्ड केला. त्या साखळीत सहा जण केवळ फॉरवर्ड करणारे निघाले. त्या टोळीचा दुसरा उद्देश अद्याप सर्वांची प्राथमिक चौकशी केली असता पुढे आलेला नाही, असेही विशाल आनंद यांनी स्पष्ट केले.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता प्रत्येक मुद्दा बारकाईने तपासल्या जात आहे. चौकशीच्या अधीन राहून ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्पुरते निलंबित केले, ते चौकशी अहवालात दोषी आढळले नाही तर त्यांचे निलंबन मागे घेतल्या जाईल.

फ्लॅट मालक व अयानच्या पालकांची चौकशी

याप्रकरणात ज्या अल्पवयीन पीडित मुलींसोबत अयान अहमद याने अमरावतीच्या फ्लॅटवर शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांचे व्हिडिओ तयार केले, त्या फ्लॅट मालकाला वेळ पडेल तेव्हा चौकशीसाठी बोलविल्या जात आहे. शिवाय संशयित अयान याच्या पालकांची देखील पोलिसांकडून टप्प्याटप्याने चौकशी सुरू असल्याचे एसपी यांनी सांगितले.

९० टक्के मुली सोशल मीडिया फ्रेंड

अयान अहमद हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होता. अनेकांना रील तयार करून देणे व मोबाईल विक्रीतून तो पैसे कमवित होता. अयानच्या संपर्कात आतापर्यंत जेवढ्या मुली आल्या त्यापैकी ९० टक्के मुलींची त्याच्यासोबत सोशल मीडियावरून ओळख झाली होती, अशी कबुली अयानने बयानात दिली.

सोशल मीडिया फॉलोअर्स वाढले

अयान काही वर्षांपासून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होता. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईपर्यंत जवळपास सतरा ते साडेसतरा हजार फॉलोअर्स होते. आता गुन्हा दाखल होऊन एसआयटी चौकशी सुरू झाल्यावर अयान अहमदचे फॉलोअर्ससुद्धा वाढल्याचे दिसून येते.