Home महाराष्ट्र नाशिक Ashok Kharat Case : SIT च्या तपासामुळे भोंदूबाबा खरातच्या अडचणीत वाढ! पोलीस कोठडीत झाली पुन्हा वाढ

Ashok Kharat Case : SIT च्या तपासामुळे भोंदूबाबा खरातच्या अडचणीत वाढ! पोलीस कोठडीत झाली पुन्हा वाढ

0
Ashok Kharat Case :  SIT च्या तपासामुळे भोंदूबाबा खरातच्या अडचणीत वाढ! पोलीस कोठडीत झाली पुन्हा वाढ
ashok kharat

नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat अशोक खरात याच्याविरोधात एकामागून एक गुन्हे दाखल होत असून, प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महिला अत्याचार, फसवणूक, अमली पदार्थांचा वापर आणि धार्मिक भावना दुखावण्यासारखे आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत.

अशातच आता नाशिकमधील भोंदूबाबा Ashok Kharat याच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी अशोक खरातला २३ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

https://prahaar.in/2026/04/19/this-years-kharif-season-is-extremely-crucial-due-to-el-nino/

विशेष म्हणजे ही सुनावणी ऑनलाईन माध्यमातून झाली. यावेळी सरकारी वकिलाकडून खरातच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यात आली. पुढे सरकारी वकिलाने आपली बाजू मांडताना सांगितले की, खरातची गुन्हा करण्याची पद्धत जरी एकसारखी असली तरीही पीडित महिला प्रत्येकवेळी वेगवेगळी होती. मात्र महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन आणि फसवणूक करून अत्याचार करण्यात आले असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील द्रव्यांचा वापर आणि संपूर्ण कटाचा तपास करण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

https://prahaar.in/2026/04/19/dagdusheth-temple-grand-offering-of-11000-mangoes-to-shrimant-dagdusheth-halwai-ganpati/

महिनाभरातील घटनाक्रम :

या प्रकरणात गेल्या महिनाभरात अनेक घडामोडी घडल्या असून त्या खालील प्रमाणे आहेत.
१७ मार्च – रात्री उशिरा अशोक खरातला अटक
१८ मार्च – न्यायालयात हजर, ७ दिवसांची पोलीस कोठडी
२० मार्च – प्रकरण SIT कडे वर्ग
२२ मार्च – तीन महिलांच्या तक्रारीनंतर गुन्हे दाखल
२५ मार्च – अमली पदार्थांचा वापर आणि धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप वाढले
२६ मार्च – ५ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद
३० मार्च – तिसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी
८ एप्रिल – आठ महिलांच्या तक्रारी, महत्त्वाचे पुरावे हाती
१३ एप्रिल – नाशिक, पुणे, शिर्डी येथे ED चे छापे
१५ एप्रिल – चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडी
१८ एप्रिल – न्यायालयीन कोठडी
१९ एप्रिल – पाचव्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी

सध्या अशोक खरात पोलीस कोठडीत असून, २३ एप्रिल रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.