Home क्राईम Mumbai Crime : मुंबईत मॉर्निग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये भीती ; नक्की काय घडतंय

Mumbai Crime : मुंबईत मॉर्निग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये भीती ; नक्की काय घडतंय

Mumbai Crime : मुंबईत मॉर्निग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये भीती ; नक्की काय घडतंय
Mumbai Crime

मुंबई : दिवसभरच्या धाकधुकीतून पहाटे व्यायामाचा, मॉर्निंग वॉकचा वेळ काढत मुंबईकर रस्त्यावर धावताना, चालताना दिसतात. सकाळच्या वेळी काही मोजकीच व्यायाम करणारी लोक असतात, याचा फायदा घेत सोनसाखळी चोरटयांनी विक्रोळी, पंतनगर आणि टिळकनगर यांसारख्या परिसराला लक्ष केलं आहे. या परिसरातून अनेक चोरीच्या घटना समोर आल्या असून परिसरात सोनसाखळी चोरांची दहशत पसरली आहे.

https://prahaar.in/2026/04/15/crime-news-fearing-a-blow-to-his-familys-reputation-a-boyfriend-did-something-shocking/

चोरी करण्याची पद्धत

सकाळी ६ ते ९ या वेळेत माणसे कमी असतात.बाकीची माणसे व्यायामात गुंतलेली असतात. चोरटे तेव्हाच आपला डाव साधत एकट्या फिरणाऱ्या महिलांना लक्ष्य करतात. दुचाकीवरून येऊन मागून महिलांच्या गळ्यातील चेन , सोनसाखळी ओढून पसार होतात. त्या परिसरातील पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार जवळपास एकूण ४ लाख ४५ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज हा लंपास झाला आहे.

https://prahaar.in/2026/04/14/crime-8-arrested-in-human-trafficking-case-163-children-rescued/

पोलिसांची करडी नजर

इतक्या गुन्ह्यांची नोंद झाल्याने पोलिसांनी या भामट्यांवर करडी नजर ठेवली, काहींना रंगेहात पडकून कायद्याचा बडगा दाखवला आहे. पंतनगर परिसरातून चोरी करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या २ सोनसाखळी चोरांना पोलिसांनी पाठलाग करता रंगेहाथ पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एकाच पद्धतीने ही चोरी केली जात आहे हे पोलिसांच्या लक्षात आले असून यामागे एखादी टोळीच असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

नागरिकांनी आपली खबरदारी घेऊनच मॉर्निंग वॉकला जावे, संशयास्पद वाटल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.