पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने मोठी कारवाई करत I-PAC (इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी) चे सहसंस्थापक आणि संचालक विनेश चंदेल यांना दिल्लीतून अटक केली आहे. याच I-PAC च्या कोलकाता कार्यालयावर यंदाच्या जानेवारीत ईडीने (ED) छापेमारी केली होती, तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वतः तेथे पोहोचल्या होत्या.
कोण आहेत विनेश चंदेल ?
https://prahaar.in/2026/04/11/chhagan-bhujbal-minister-chhagan-bhujbals-plane-crash-narrowly-avoided/
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक :
ईडीच्या माहितीनुसार, विनेश चंदेल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर PMLA कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई बहुचर्चित ‘कोळसा घोटाळ्या’शी संबंधित आहे. तपास यंत्रणेनुसार, कोळसा चोरी आणि तस्करीतून मिळालेला कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा हवाला मार्गे I-PAC च्या खात्यांपर्यंत पोहोचवण्यात आला होता.
https://prahaar.in/2026/04/14/mumbai-shaken-death-scare-at-live-concert-2-students-die-due-to-drug-overdose/