Home देश Dr Babasaheb Ambedkar Jayanti : ज्यांनी भाकरी दिली, त्यांनाच भाकरीवर अर्पिली कलावंदना!

Dr Babasaheb Ambedkar Jayanti : ज्यांनी भाकरी दिली, त्यांनाच भाकरीवर अर्पिली कलावंदना!

0
Dr Babasaheb Ambedkar Jayanti : ज्यांनी भाकरी दिली, त्यांनाच भाकरीवर अर्पिली कलावंदना!
Kolhapur News

कोल्हापूरच्या अमित माळकरींनी साकारले बाबासाहेबांचे अनोखे चित्र

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला आणि कष्टकऱ्यांच्या हाताला काम देऊन त्यांच्या भाकरीचा प्रश्न मिटवला. याच कृतज्ञतेपोटी कोल्हापूरचे प्रसिद्ध सँड आर्टिस्ट अमित माळकरी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एका वेगळ्या माध्यमाचा वापर करून आपली कला सादर केली आहे. त्यांनी चक्क भाकरीवर बाबासाहेबांचे हुबेहूब चित्र साकारून त्यांना अनोखी मानवंदना दिली आहे.

https://prahaar.in/2026/04/14/nashik-crime-news-trimbakeshwar-temple-trustee-purushottam-kadlag-arrested-police-sting-operatio/

‘ज्यांनी भाकरी दिली, त्यांनाच भाकरीतून अभिवादन’

अमित माळकरी हे त्यांच्या वाळूशिल्पांसाठी (Sand Art) प्रसिद्ध आहेत. मात्र, यावेळी त्यांनी एक आगळावेगळा प्रयोग करण्याचे ठरवले. “ज्या महामानवाने कोट्यवधींच्या आयुष्यातील अंधार दूर करून त्यांना भाकरी मिळवून दिली, त्याच भाकरीवर त्यांचे रूप साकारणे ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे,” अशा शब्दांत माळकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कलेचा अनोखा आविष्कार

हे चित्र साकारण्यासाठी माळकरी यांनी अत्यंत संयमाने आणि कौशल्याने काम केले आहे. भाकरीच्या खडबडीत पृष्ठभागावर बाबासाहेबांचे चष्मा, कोट आणि त्यांचे तेजस्वी हावभाव जिवंत करणे हे मोठे आव्हान होते. केवळ नैसर्गिक रंगांचा आणि माध्यमांचा वापर करून त्यांनी हे रेखाचित्र पूर्ण केले आहे. हे चित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून त्यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे.

अमित माळकरी यांचा परिचय

अमित माळकरी हे केवळ एक कलाकार नसून ते सध्या कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ते आपल्या कलेच्या माध्यमातून भाष्य करत असतात. वाळू असो किंवा आताची भाकरी, प्रत्येक माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.