नाशिकमध्ये भोंदूगिरी करून लोकांची फसवणूक केल्याच्या आरोपातील अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने मोठी कारवाई करत त्याच्या लक्झरी कारची जप्ती केली असून इतर मालमत्ताही त्याला अटॅच करण्यात आली आहे. सोमवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीपासून चौकशीला सुरुवात :
चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना :
तपासादरम्यान न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली होती. या एसआयटीचे नेतृत्व आयपीएस अधिकारी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आले.
दरम्यान, सुमारे दीड महिन्याच्या तपासानंतर ईडीने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. सोमवारी १३ एप्रिल रोजी अशोक खरात यांच्या नाशिक येथील निवासस्थानी तसेच सिन्नर येथील आश्रमावर छापे टाकण्यात आले.
https://prahaar.in/2026/04/13/n-chandrasekaran-tata-sons-chairman-speaks-on-the-corporate-jihad-controversy/
या छाप्यांदरम्यान ईडीने खरात यांची लक्झरी कार जप्त केली असून इतर काही मालमत्तांवरही अटॅचमेंटची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील तपास अधिक वेगाने पुढे जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.