Home ब्रेकिंग न्यूज Asha Bhosle Funeral : आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज; वाहतुकीत होणार महत्त्वाचे बदल

Asha Bhosle Funeral : आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज; वाहतुकीत होणार महत्त्वाचे बदल

0
Asha Bhosle Funeral : आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज; वाहतुकीत होणार महत्त्वाचे बदल
asha tai

– शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार, मुंबईत कडेकोट बंदोबस्त

मुंबई : भारतीय संगीतविश्वातील दिग्गज गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, सोमवारी दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) यांनी व्यापक तयारी केली आहे. अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांची गर्दी अपेक्षित असल्याने सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आणि पालिका सज्ज :

जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विस्पुते यांनी अंत्यसंस्कार स्थळाची पुष्टी केली आहे. यापूर्वी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आणि रतन टाटा (Ratan Tata) यांच्या अंत्यसंस्कारावेळी केलेल्या नियोजनाचा अनुभव लक्षात घेऊन प्रशासन सज्ज झाले आहे.

सर्वसामान्य नागरिकांना अंत्यदर्शन सुलभ व्हावे आणि व्हीआयपींच्या हालचालींमुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र कॉरिडॉरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय, वाहतुकीतही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

https://prahaar.in/2026/04/13/melody-queen-asha-bhosale/

वाहतूक आणि नागरी सुविधांचे नियोजन:

अंत्यदर्शन घेताना होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले आहेत:

– आज दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार पार पडतील.

– स्वांतत्र्यवीर सावरकर मार्ग आणि दादर-माहीमला जोडणाऱ्या लेडी जमशेटजी रोडवर वाहतुकीचे निर्बंध असतील.

– कोहिनूर प्लाझा पब्लिक पार्किंगचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

– रस्त्यावरील पार्किंगवर पूर्णपणे बंदी असेल. मात्र, परिसरातील रहिवाशांच्या पार्किंगला परवानगी दिली जाईल.

– मोठी गर्दी अपेक्षित असली तरी परिसरातील इतर नागरी सेवा विस्कळीत होणार नाहीत, याची काळजी पालिकेने घेतली आहे.

सकाळी आणि रात्री फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना शिवाजी पार्क परिसरात नेहमीप्रमाणे प्रवेश मिळेल. संपूर्ण मुंबई आज आपल्या लाडक्या आवाजाला अखेरचा निरोप देण्यासाठी सज्ज झाली असून पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.